हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेले काही दिवस बिग बॉस मराठीच्या घरात ‘गद्दार’ हा शब्द चांगलाच घुमला. एकीकडे अख्खा महाराष्ट्र या शब्दात गुंतलाय आणि दुसरीकडे बिग बॉसचे स्पर्धक. अलीकडेच बिग बॉसच्या घरात एक टास्क झाला. ज्यामध्ये बिग बॉसने स्पर्धकांना त्यांना वाटणाऱ्या एका सदस्याला गद्दार टॅग लावण्याची संधी दिली. यावेळी विकासने गेम पलटून त्याच्या लाडक्या दादाला म्हणजे किरण मानेला गद्दार म्हटलं आणि इथेच सगळं बिघडलं. या प्रकारामुळे माने दुखावेल आणि शेवटी आपला संताप व्यक्त करून गेले.
नुकताच बिग बॉस मराठीच्या घरात एक टास्क झाला. ज्यामध्ये जो कोणी तुम्हाला गद्दार वाटत असेल त्याला हा बॅच लावा असे सांगण्यात आले होते. या टास्कमध्ये रुचिरा अपूर्वाला आणि अक्षय केळकर रोहित शिंदेला गद्दार ठरवताना दिसला. पण यानंतर सगळ्यात मोठा गेम तर विकास सावंत खेळून गेला. कारण या टास्कमध्ये विकासने त्याच्या लाडक्या दाद्याला म्हणजेच किरण माने यांना गद्दार ठरवलं. हे पाहून सगळ्यांनाच धक्का लागला. आजवर घरात प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीत विकासला माने पाठिंबा देताना दिसले. ज्याच्यासाठी किरण संपूर्ण घराशी भांडले तोच फिरला.
नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला प्रोमो बरंच काही बोलून गेला आहे. या प्रोमोमध्ये विकास किरणची मनधरणी करताना दिसतोय. यावर किरण विकासला म्हणतो कि, ‘खेळायला कोणी शिकवलं तुला बिग बॉस..? या घरात तुला कुत्र विचारत नव्हतं तेव्हा कोणी विचारलं तुला..? त्यावर विकास म्हणाला, तुम्हीचं.. यावर किरण माने म्हणाले कि, हे सांगायला काय जीभ जड झाली तुझी..? कानफाडीत द्यायला हवी होती मी तुला.. तुझा माझा आता संबंध संपला…’ यावरुन समजतंय कि कालचा प्रकार मानेंच्या फारच जिव्हारी लागला आहे आणि यामुळे त्यांनी विकासशी संबंध तोडले आहे.
Discussion about this post