हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वात स्वबळावर एक भक्कम जागा निर्माण करणारी अभिनेत्री धनश्री कडगांवकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे तिने शेअर केलेल्या प्रत्येक पोस्टवर तिचे चाहते आवर्जून प्रतिक्रिया देताना दिसतात. सध्या धनश्रीचा जेवतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये ती काही विचित्र आणि वेगळ्याच अंदाजात जेवताना दिसत आहे. याच कारण म्हणजे तिची अक्कल दाढ काढली आहे. यावर एक कमल कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
धनश्रीने हा व्हिडीओ तिच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एका हॉटेलमध्ये आपल्या मित्रांसोबत संवाद साधत जेवताना दिसतेय. या व्हिडिओत धनश्रीला जेवताना पाहून कुणालाही हा प्रश्न पडेल कि, जेवणाची कुठली स्टाईल..? म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर तिने कॅप्शनमधून दिलंय. यामध्ये तिने सांगितलं आहे की, अक्कलदाढ काढल्यामुळे तिला एका बाजूने जेवावं लागतंय. अक्कलदाढ काढली असली तरी माझं शहाणपण गेलेलं नाही असं ती मित्राला सांगते. चार लोकात बसून तू अशी जेवतेय हे मला ॲडजस्ट करावं लागतंय’ असं म्हणत तिचा मित्र तिची चेष्टा करतोय. यावर धनश्री म्हणते, वेदनेमुळे हसणं देखील कठीण झालं असतानाही मी चाहत्यांच्यासोबत फोटो काढतेय.’
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये धनश्रीने लिहिलं आहे कि, ‘तुमच्या आयुष्यात आहेत का असे काही मित्र जे विचारतात, अक्कलदाढ काढली आता तरी येईल ना अक्कल..? किंवा अक्कलदाढ काढल्यामुळे सगळी अक्कल पण गेली का..?’ असे टिपिकल प्रश्न तुमच्या मित्रांनीही विचारलेत का..? अभिनेत्री धनश्री कडगांवकरने आजवर अनेक मराठी मालिकांमधून काम केलं आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतील तिची वहिनीसाहेब हि भूमिका गाजली. शिवाय सध्या सुरु असलेल्या ‘तू चाल पुढं’ या मालिकेतील शिल्पी देखील प्रेक्षकांना भावतेय.
Discussion about this post