हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेम प्रकरणातून आत्महत्या, एकतर्फी प्रेम हत्याकांड, प्रेमाच्या जाळ्यात फसवून केले वाईट कृत्य अशा अनेक घटना आणि अनेक बातम्या तुम्ही दिवस भरात ऐकत असाल किंवा वाचत असाल. पण दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने मात्र संपूर्ण देशच हादरला. श्रद्धा नामक एका युवतीचा बॉयफ्रेण्ड आफताब पूनावाला याने तिला जीवानिशी मारून तिचे ३५ तुकडे केले आणि ते तुकडे फ्रिजमध्ये ठेवले. यानंतर तपासात समजलं कि, श्रद्धाच्या प्रियकराने तिला मारून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते जंगलात फेकून दिले. या घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आणि कोणी इतकं पाताळयंत्री आणि निर्दयी कसं असू शकत असा सवाल उपस्थित झाला. यातच मराठी अभिनेत्री केतकी चितळेने या घटनेवर एक पोस्ट शेअर केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येपूर्वी गुन्हेगाराने या गुन्ह्यासंदर्भातल्या अनेक वेबसिरीज आणि चित्रपट पाहिले होते. ज्यामध्ये अमेरिकी सिरीज डेक्स्टर हिचा समावेश आहे. या वेब सिरीजवरुन प्रेरणा घेत त्याने हा खून केल्याचे समजले आहे. यावर अभिनेत्री केतकी चितळेने पोस्ट करत श्रद्धासारख्या किती मुलींचा बळी घेतला जाणार..? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या पोस्टमध्ये केतकीने म्हटलं आहे कि, ‘मेरा अब्दुल ऐसा नहीं बरोबर आहे. कारण आप मेलं, जग बुडालं. पण ३५ तुकडे होताना, गळा दाबला जाताना कुठे तरी पश्चात्ताप होत असेल ना? कुटुंबियांची आता काय मानसिक स्थिती असेल याचा विचार केल्यास अंगावर काटा येतोय. मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना डोळे उघडून पुन्हा (या वेळी कायमचे) मिटणार आहात? का आता तरी निद्रा मोडणार आहात ? !!!? #जागोमेरेदेश ।।जय हिंद।। ।। वंदेमातरम्।। ।। भारत माता की जय ।। हे हॅशटॅग वापरात तिने हि पोस्ट शेअर केली आहे.
केतकी चितळेच्या पोस्टला अनेकांनी समर्थन दिले आहे. या जगात प्रेम आहे का नाही..? असा प्रश्न उपस्थित करणारी हि घटना पाहिल्यानंतर एकच सांगावं वाटत कि.. प्रेम करा. यात वाईट काहीच नाही वा कुणाची मनाई देखील नाही. जगाशी भांडून प्रेम करताना ते टिकवताना मात्र डोळ्यावर झापडं लावून घेऊ नका. प्रेमात विश्वास असावा अंधविश्वास नसावा. आज जे श्रद्धासोबत झालं ते इतर कोणत्याही मुलीसोबत वा मुलासोबत देखील होऊ शकत. या प्रकरणात श्रद्धाला अलताफ आधीपासून मारहाण करीत होता. कितीकदा ती बेशूद्ध होइपर्यंत तो तिला मारत असे. पण प्रेमाखातर ती त्याच्यासोबत राहत होती. आज तिच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाला लागलेला धक्का न सावरता येणारा आहे. त्यामुळे तुम्हीही आधी विचार करा आणि मगच कृती करा.
Discussion about this post