हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने ६ नोव्हेंबर २०२२ रोजी एका अतिशय गोड मुलीला जन्म दिला. आलिया आणि रणबीरचं हे पहिलंच बाळ असून त्याच्या आगमनाने संपुन कपूर घरात आनंदी आनंद पसरला आहे. आपल्या लेकीला पहिल्यांदा हातात घेतल्यानंतर बाप झालेला रणबीरही भरलेले डोळे लपवू शकला नाही. आई आणि वडील होण्याचं हे जगातील सगळ्यात सुंदर फिलिंग आता रणबीर आणि आलिया उपभोगत आहेत. याच आनंदात चाहत्यांनाही सहभागी करून घेण्यासाठी आलियाने आई झाल्यानंतर पहिलीच पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक फोटो शेअर केला आहे जो व्हायरल होतोय.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हि बॉलिवूड सिने इंडस्ट्रीतील कमी वयातील क्युट आई आहे. तिच्या प्रेग्नेंसीची न्यूज समजल्यापासूनच तिचे आणि रणबीरचे चाहते बाळाच्या आगमनाची वाट पाहत होते. यानंतर आता जेव्हा आलिया एका गोड परीची आई झाली आहे तेव्हा चाहत्यांना कधी एकदा बाळाची झलक पहायला मिळते असं झालं आहे.
या दरम्यान आलियाने आई झाल्यानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्या हातातला कप दिसतोय पण ती ब्लर दिसतेय. या लाल रंगाच्या या कपवर ‘ममा’ असं लिहिलेलं आहे. या फोटोवरून आपण समजू शकतो कि आलीय तिचं मातृत्व एन्जॉय करते आहे.
आलियाने हा फोटो शेअर करत सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘इट्स मी’ म्हणजेच हि मी आहे. यासोबत तिने पिवळ्या रंगाचा हार्ट इमोजीदेखील शेअर केला आहे. आलियाच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी लाईकचा वर्षाव केला आहे. या पोस्टवर अनेक नेटकरी आलियाला परी कशी आहे..? कुठे आहे..? तसेच तीच नाव काय ठेवणार आहेस..? तिचा फोटो कधी शेअर करशील..? असे विविध उत्सुकतापूर्ण प्रश्न विचारत आहेत.
Discussion about this post