हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजचं जग जितकं आधुनिक होतंय तितकंच रहस्यमयी आणि धोकादायक देखील होत चाललं आहे. आजकाल सायबर क्राईमची प्रकरणे इतकी वाढली आहेत कि काय बोलायचं काम नाही. अशा आधुनिकतेच्या आड बसून चोरी करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. लोक आपल्या व्यस्त जीवनात आधुनिकतेच्या आहारी जातात आणि अशा फ्रॉडला बळी पडतात. मात्र अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारेच्या सतर्क भूमिकेमुळे ती सायबर क्राईमची शिकार होण्यापासून बचावली आहे. याची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
उर्मिलाने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने बँकेच्या नावाने आलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या मेसेजमध्ये लिहिलं आहे कि, ‘तुम्ही एचडीएफसी बॅंकेतील खात्याची केवायसी अपडेट केलेली नाही. यामुळे तुमचं खातं ब्लॉक करण्यात आलं आहे. केवायसी अपडेट करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.’
याचा स्क्रीनशॉट शेअर करत उर्मिलाने लिहिलं कि, ‘मला आताच असा एक मेसेज आला आहे. अनेकदा असा मेसेज वाचल्यानंतर लोक पॅनिक होतात आणि अशा लिंकवर क्लिक करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या खासगी गोष्टींची माहिती फ्रॉड लोकांकडे जाते. त्यामुळे तुमचं बॅंक अकाऊंट हॅक होऊ शकतं. मला आलेल्या मेसेजमधली लिंक मी पाहिली पण त्याच एचडीएफसी बॅंकेचे पूर्ण नाव लिहिण्यात आले नव्हते. त्यामुळे मला शंका आली. मित्रांनो माफ करा. माफ करा आज तुमचे नशिब जरा कमजोर आहे.’
अभिनेत्री उर्मिला कोठारेने हा मेसेज फ्रॉड आहे हे सांगण्यासाठी तसेच आपल्या चाहत्यांना अशा गोष्टींपासून सतर्क करण्यासाठी हि पोस्ट शेअर केली आहे. सोबतच तिने म्हटले आहे कि, ‘मोबाईलवर येणाऱ्या लिंकची आधी माहिती घ्या. पॅनिक न होता शांततेत ते पुन्हा वाचा त्यानंतरच क्लिक करा.’ स्कॅम अर्लट म्हणत तिने ही माहिती नेटकऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे. उर्मिलाच्या हुशारीमूळे आणि सावधगिरीमूळे आज ती सायबर क्राईमची शिकार होता होता राहिली. मात्र अनेक लोक धावपळीच्या आयुष्यात अशा चुका करून बसतात आणि नंतर पश्चाताप करत राहतात. त्यामुळे सतर्क रहा आणि अशा मेसेजला बळी पडू नका.
Discussion about this post