Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रेमाच्या नावानं ‘फतवा’ काढलाय; प्रेमाचा वेगळा पैलू उलघडणाऱ्या मराठी चित्रपटाचा टिझर चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 16, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Fatva
0
SHARES
59
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आतापर्यंत आपण प्रेमकथा पहिल्या असतील. ज्यामध्ये एक प्रियकर, एक प्रियसी आणि ठरलेला व्हिलन पाहिला असेलच. पण कधी नामंजूर प्रेमविरोधात फतवा काढल्याचे पाहिलंय का..? नाही ना.. अशाच आगळ्यावेगळ्या प्रेमकथेचा एकल आगळा वेगळा पैलू उलगडायला ‘फतवा’ हा मराठी चित्रपट येऊ घातला आहे. तुम्ही राजकीय क्षेत्रातील कित्येक फतवे आणि त्यांच्या बातम्या ऐकला असालं. पण आता ‘फतवा’ हे शीर्षक असणारा मराठी चित्रपट रुपेरी पडद्यावर येतो आहे. ज्याचा टिझर सोशल मिडीयावर धुमाकूळ घालतोय.

View this post on Instagram

A post shared by Follow Follow – Shivali Jamdade (@shivali.jamdade)

या चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक लॉन्च सोहळा अलीकडेच पार पडला. ब्ल्यु लाईन फिल्मस् प्रस्तुत आणि प्रतिक गौतम दिग्दर्शित ‘फतवा’ हा चित्रपट येत्या ९ डिसेंबर २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. फतवा या चित्रपटातून प्रतिक गौतम आणि श्रद्धा भगत ही नवीकोरी फ्रेश जोडी मराठी रुपेरी पडद्यावर मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटात प्रतीक आणि श्रद्धा यांच्या व्यतिरिक्त छाया कदम, मिलिंद शिंदे, नागेश भोसले, संजय खापरे,अमोल चौधरी, निलेश वैरागर, पूनम कांबळे, निखिल निकाळजे, निकिता संजय हे कलाकारदेखील दिसणार आहेत. ‘फतवा’ या चित्रपटाची निर्मिती डॉ.यशवंत, प्रेमा निकाळजे आणि अनुराधा पवार यांनी केली आहे.

‘फतवा’ या चित्रपटाची कथा प्रतिक गौतम यांची आहे. तर छायांकन दिलशाद व्ही.ए. यांचे आणि संकलन फैजल महाडिक, इमरान महाडिक यांचे आहे. तसेच रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे तर वेशभूषा वर्षा यांची आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत. तसेच चित्रपटात वेगवेगळ्या ढंगातील ६ गाणी आहेत. हि गाणी बाबा चव्हाण यांनी लिहिली असून संगीतबद्ध केली आहेत. यातील ‘अलगद मन’ हे गाणे गायिका पलक मुच्चलने गायले आहे. तर ‘प्रेमाचा गोंधळ’ गायक नंदेश उमप यांनी गायले आहे. याशिवाय अभय जोधपूरकर, वेदा नेरुरकर यांच्याही आवाजातील काही गाणी आहेत. यांसह पद्मश्री सोनू निगम यांनीही चित्रपटातील एक गाणे गायले आहे. ‘फ़तवा’ चित्रपटातून प्रेमाचा वेगळा पैलू उलगडणार असून हा चित्रपट प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे.

 

Tags: Marathi upcoming movieOfficial Teaserviral postYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group