हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कुणीही कितीही मोठं झालं तरी प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या उराशी बाळगलेलं एक छोटंसं का होईना स्वप्न असतंच. ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीचा आनंद काहीसा औरच असतो. असाच आनंद सध्या मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी अनुभवते आहे. सोनालीला नेहमीच ‘अटारी’ म्हणजे भारत पाकिस्तान सीमेवरील ‘वाघा’ बॉर्डरवर जायचं होत आणि तीच हे स्वप्न आता पूर्ण झालं आहे. हा अनुभव काय आणि कसा होता ते तिने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे.
ही पोस्ट सोनाली कुलकर्णीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर शेअर केली आहे. हि पोस्ट शेअर करताना काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘अटारी/ वाघा बॉर्डर.. किती वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली. इथला उत्साह पाहून खूप आनंद झाला. इथे देशभक्ती खऱ्या अर्थाने वाहते. प्रचंड उर्जा.. भावनांचा सागर.. हाय व्होल्टेज.. प्रचंड अभिमान. मी हे सगळं का लिहिलंय हे पाहण्यासाठी सोबत दिलेले फोटो पाहा.’ सोनालीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. सोबतच अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.
लहानपणापासून पाहिलेले ‘वाघा’ बॉर्डरवर जाण्याचे स्वप्न सोनालीचे आता पूर्ण झाले आहे. तिने हे स्वप्न आपल्या कुटुंबासोबत पूर्ण केले आहे. तिथे घालवलेले काही क्षण तिने शेयर केले आहेत. यावेळी तिच्यासोबत तिचा पती कुणाल बेनोडेकर, सासू- सासरे, आई- वडील आणि भाऊदेखील आहे. संपूर्ण कुटुंबासोबत तिने अटारी सीमेला भेट दिली आणि सोबत शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने भारत पाकिस्तान सीमेवर होणाऱ्या लष्करी घडामोडी, वाजणारे देशभक्तीपर संगीत, प्रचंड गर्दी असे अंगावर काटा आणणारे वातावरण आपल्या चाहत्यांसह शेअर केले आहे.
Discussion about this post