हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सब टीव्ही वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचे लाडके आहे. यातील प्रत्येक कुटुंब प्रेक्षकांना आपलं वाटत. खास करून गडा परिवारावर लोक विशेष प्रेम करतात. अशातच या परिवारातील ज्येष्ठ सदस्य अर्थात चंपकलाल गडा म्हणजेच अभिनेता अमित भट्ट यांच्या चाहत्यांसाठी महत्वाची आणि दुःखद बातमी समोर येत आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेच्या सेटवर एका अपघातात अमित भट्ट यांना दुखापत झाली आहे आणि यामुळे त्यांना डॉक्टरांनी बेड रेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामुळे येत्या काही काळात त्यांना शूट करता येणार नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रेक्षकांचे लाडके चंपक चाचा उर्फ अभिनेता अमित भट्ट हे मालिकेच्या शूटिंगदरम्यान सेटवर जखमी झाले आहेत. इतकचं नव्हे तर या दुखापतीमुळे त्यांना पुढील अनेक दिवस शोसाठी शूटिंग करता येणार नाही. ज्यामुळे आगामी काळातील काही भागांमध्ये ते दिसणार नसल्याचं बोललं जात आहे. हि बातमी सोशल मीडियावर पसरताच त्यांच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा अपघात नेमला झाला कसा..? त्यांच्या प्रकृती कशी आहे असे प्रश्न चाहते विचारात आहेत.
तर मिळालेल्या माहितीनुसार, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या स्क्रिप्टच्या गरजेनुसार एका सीनमध्ये चंपक चाचांना पळायचं होतं. याच सीनच्या शूटिंगदरम्यान चंपक चाचा म्हणजेच अभिनेता अमित भट्ट यांचा धावताना तोल गेला आणि ते जमिनीवर खाली पडले. यामुळे अमित यांना गंभीर जखम झाली आहे. दरम्यान त्वरित डॉक्टरांनी तपासले असता अमित भट्ट यांना काही काळासाठी बेड रेस्टचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे शोच्या निर्मात्यांनीही अमित याना विश्रांती घेण्यास सांगितले आहे. परिणामी पुढील काही भागांसाठी चंपक चाचा हे पात्र प्रेक्षकांना दिसणार नाही.
Discussion about this post