हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी रंगभूमी, छोटा पडदा आणि मोठा पडदा गाजवणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर जितका उत्तम अभिनेता तितकाच उत्तम लेखन आहे हे काही विशेष सांगायला नको. केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्येदेखील अत्यंत वेगळी अशी भूमिका साकारून चर्चेत राहिलेला चिन्मय नेहमीच विविध भूमिका वठविण्याची जबाबदारी घेत असतो. यावेळी त्याने हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ चित्रपटात आमदाराची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट आजपासून प्रदर्शित झाला आहे हे सांगताना त्याने एक खास क्षण आपल्यासोबत शेअर केला आहे.
‘सनी’ या चित्रपटात ललित प्रभाकर मध्यवर्ती भूमिकेत आहे. तर चिन्मय मांडलेकर महत्वपूर्ण सहाय्यक भूमिकेत. यात तो एका आमदाराची भूमिका साकारत आहे. याच निमित्ताने चिन्मयने हि पोस्ट शेअर केली आहे. जी हेमंतला उद्देशून करण्यात आली आहे. यात चिन्मयने लिहिले आहे की, ‘ह्यांना काय कळतं रे..? मी सांगतो तेवढंच कर.’ असा दृष्टांत माननीय दिग्दर्शक हेमंतजी ढोमे यांनी मला दिला, तोच हा ऐतिहासिक क्षण. मी तेच आणि तेवढंच केलंय. आज पासून सर्वत्र प्रदर्शित झालाय ‘सनी’. नक्की बघा.
‘सनी’ या चित्रपटात विश्वजित मोहिते पाटील या कार्यसम्राट आमदाराच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर दिसतो आहे. चित्रपटातील विश्वजित आणि सनी या दोन भावांमध्ये काहीसा दुरावा असल्याचे दिसते. पण हा दुरावा का आला..? कसा आला…? आणि कश्यासाठी आला..? हे जाणून घेण्यासाठी मात्र तुम्हाला हा चित्रपट पहावा लागेल.
क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित ‘सनी’ हा सिनेमा आज १८ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला असून याचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे या सिनेमाचे निर्माते आहेत. तर संतोष खेर आणि तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.
Discussion about this post