Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘शालिन, टीनाच्या तोंडावर लाथ मार.. त्यांना त्यांची लायकी दाखव’; सुंबुलच्या वडिलांचा लेकीला सल्ला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 22, 2022
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
115
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीवरील बिग बॉस १६ एका रंजक वळणावर आला आहे. या गेममध्ये प्रेम, दोस्ती, दुष्मनी हि नाती नेहमीच आपण पहिली आहेत. मात्र यावेळी क्रश, ओब्सेशन अशा शब्दांचा प्रयोग या घरात झाला. शालीन आणि टिनाची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरलेला असताना इथे सूंबुल काहीश्या वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत राजीला. शालीनसाठी तिची ओढ तिच्या भावनांना लव्ह ट्रँगलकडे घेऊन गेली. ज्यामुळे सलमानने गेल्या विकेंडला तिला समाज दिली होती. यांनतर सूंबुलच्या वडिलांची तब्येत खराब झाल्यामुळे तिला कन्फेशन रूममध्ये बोलावून फोन जोडून देण्यात आला. तेव्हा तिच्या वडिलांनी काही सल्ले देत मुलीला दिलासा दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

‘ईमली’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुंबुल तौकीर हि स्वतः लहान वयात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आहे. मात्र वय कोवळं असल्यामुळे तिच्याकडून काही चुका होणे साहजिक आहे. ज्यामध्ये टीव्ही अभिनेता शालिन भनोत आणि ‘उतरन’ फेम टीना दत्ता यांच्यामध्ये अडकून ती एका ‘लव्ह ट्रँगल’चा भाग झाली. हे पाहून तिच्या वडिलांना धक्का बसला आणि त्यांची तब्येत खराब झाली. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये सुंबुलला तिच्या वडिलांशी फोनवर बोलण्याची संधी मिळाली आणि यावेळी त्यांनी लेकीला समजावत शालीन आणि टिनाची खरडपट्टी काढली.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

सूंबुलचे वडील म्हणतात कि,’ बेटा, हे मी काय पाहतोय?’ यावर सुंबुलला रडू कोसळतं. ती म्हणते, ‘पापा, मलाच कळत नाहीये काय होतंय. मी खरं सांगतेय.’ यावर वडील म्हणतात कि, ‘तुला माहितीये का, बाहेर लोक तुझ्याबद्दल बरं वाईट बोलतायत. लोक म्हणतायत की १८ वर्षांची मुलगी ही ४० वर्षांच्या माणसाच्या मागे लागली आहे’. यावर सुंबुल म्हणते, ‘पापा, तुम्ही मला नीट ओळखता. मी अशी अजिबात नाही. ते लोक समोर वेगळं वागतात आणि मागे वेगळं बोलतात. तुम्ही या गोष्टींवर विश्वास ठेवू नका.’ यावर वडील म्हणतात कि, ‘ती लोकं चांगली नाहीत. ते शिव्या देतात. आता तू शालिन आणि टीनाला त्यांची लायकी दाखव. शालिन भनोत आणि टीना दत्तापासून तू चार हात लांबच राहा. मी तुझ्यावर नाराज नाही. नॅशनल टीव्हीवर तू टीनाला तिची जागा दाखव. यांच्या तोंडावर लाथ मार.’ यावर सूंबुल म्हणते, ‘तुम्ही जसं म्हणाल तसं मी करेन’. यामध्ये शालिन आणि टीना सूंबुलच्या मैत्रीचा गैरफायदा उचलत असल्याचे ते लेकीला सांगतात आणि त्यांच्यापासून लांब राहण्याचा सल्ला देतात.

Tags: Bigg Boss 16Colors TVShalin BhanotSumbul Touqueer KhanTina Dutta
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group