हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच कारणांमुळे प्रचंड चर्चेत अली आहे. हे कारण आहे घटस्फोट. होय. ती आणि तिचा पती प्रदीप खरेरा एकमेकांपासून विभक्त होत आहेत. मानसी सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे तिने तिच्या आयुष्यातील भावनिक वादळ विविध भावनांच्या छटांमधून व्यक्त केले होते. विविध पोस्ट शेअर करत तिने पतीपासून वेगळं होत असल्याचे संकेत दिले होते आणि त्यामुळे तिच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. ज्यावर तिने कोणतेही अधिकृत भाष्य केले नव्हते. यानंतर अखेर आता ती बोलली आहे.
सोशल मीडियावर तिच्या घटस्फोटाची रंगलेली चर्चा पाहून आता यावर पडदा टाकत तिने मोठा खुलासा केला आहे. मानसीच्या कौटूंबिक वादाविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल होत असल्याचे सोशल मीडियावर दिसून आले. या चर्चांनी काही वेगळे रूप घेऊ नये म्हणून मानसीनेच अधिकृत भाष्य केले आहे.
हिंदूस्तान टाईम्सशी बोलताना मानसीने सांगितले आहे कि, तिने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला आहे. यानंतर आता मानसी आणि प्रदीप एकमेकांपासून वेगळे होणार असल्याचे अधिकृतपाने समोर आले आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर मानसी आणि तिच्या घटस्फोटाची चर्चा हा ट्रेंडिंगचा विषय झाला आहे.
सोशल मीडियावर मानसीचा मोठा चाहतावर्ग मोठा आहे. जो मानसी आणि प्रदीपच्या व्हिडीओ तसेच फोटोंवर मोठ्या प्रमाणात प्रेमाचा वर्षाव करताना दिसायचा. या चाहत्यांना मानसी आणि प्रदीप यांच्या घटस्फोटाच्या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी त्यांना पुन्हा एकत्र या.. असं करू नका असे सॅले दिले आहेत.
मात्र गेल्या काही काळापासून मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्यात काही आलबेल नव्हतं. गेल्या वर्षी मानसी आणि प्रदीप यांनी लग्न केलं. पण अवघ्या दीड वर्षातच दोघांमध्ये अंतर आले आहे. त्यामुळे आता या नात्याला पूर्ण विराम देण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय.
Discussion about this post