हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ड्रामा नुसता शब्द जरी उच्चारला तरी सगळ्यात आधी तुम्हाला काय आठवतं..? आम्हाला तर राखी सावंत आठवते. कारण कधी, कुठे आणि कशावर मुद्दा बनवायचा. कशावर नखरे करायचे आणि कुठे ड्रामा हे तिला बरोबर कळतं. अशी कुठलीच जागा नाही जिथे राखीने सीमा ओलांडली नाही. आता काय तर मॅडम टॉयलेटमध्ये पण व्हिडीओ बनवू लागल्या आहेत. आहे कि नाही कहर… मजा म्हणून बनवलेला हा व्हिडीओ मात्र राखीला चांगलाच महागात पडलाय. ट्रोलर्सने तिला इतकं ट्रोल केलंय कि बस्स रे बस्स!
राखी सावंतला ओव्हर अक्टिंगचं दुकान आणि ड्रामाक्वीन उगाच बोलत नाहीत. कोणत्या ना कोणत्या कारणाने कसं चर्चेत यायचं हे ती बरोबर समजून आहे. सोशल मीडियाचं लक्ष वेधून घेण्याच्या नादात ती काहीही अतरंगी गोष्टी करताना दिसते. आता सध्या ती दुबईमध्ये फिल्मफेअरच्या कार्यक्रमासाठी बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीला घेऊन गेलीये. यावेळी तिने दुबईतील एका टॉयलेटमधला व्हिडीओ शेअर केलाय. होय. टॉयलेटचा व्हिडीओ. दुबईच्या एका हॉटेलमधील गोल्डन कलरच्या बाथरूमची आणि वॉश बेसिनची सिंकची ती ओळख करून देताना या व्हिडिओत दिसते. दरम्यान ती बाथरूमधील मॉर्निंग रूटीन दाखवतेय. पुढे हे सगळं आपण चोरी करणार आहोत असेही म्हणते. हे पाहून तिचे काही चाहते पोट धरून हसलेत. तर काहींनी मात्र संताप व्यक्त केलाय.
या व्हायरल व्हिडिओवर एकाने लिहिले आहे कि, ‘हिला कशाला बोलावलं.. मस्ती मजाकच्या नादात इज्जत काढतेय हि.’ तर आणखी एकाने लिहिले कि, ‘आम्ही रोज सकाळी बाथरूममध्ये जातो आणि कसं धुवायचंय ते माहिती आहे आम्हाला’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘तू काय पहिल्यांदा गेलीयेस का..? कशाला फालतूपणा करते..?’ तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘सकाळ सकाळ पागलसारखी का वागते आहेस बाई.?’ तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘घोड़ों को नहीं मिल रही है घास, गधे खा रहे हे च्यवनप्रास’. तसेच आणखी एकाने व्हिडीओग्राफरला झापले आहे. त्याने लिहीलंय कि,’ तिला अक्कल नाही पण तुला कळत नाही का.. टॉयलेटमध्ये कॅमेरा काय घेऊन जातोस..?’
Discussion about this post