हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाल्याच्या वृत्तांनी बुधवार रात्रीपासून जोर धरला होता. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे अनेक वृत्त संस्था, पोर्टलने म्हटले होते. तसेच अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेते मंडळींनी ट्विट करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. ज्यामुळे संपूर्ण सिनेविश्वावर शोककळा पसरली असून चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र विक्रम गोखले यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे निधन झालेले नाही. अद्याप त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
"Veteran Actor Vikram Gokhale is still critical and on life support, he has not passed away yet. Keep praying for him," confirms Vikram Gokhale's daughter
(File pic) pic.twitter.com/bs53dFIbxE
— ANI (@ANI) November 23, 2022
माहितीनुसार प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत असले तरीही ते उपचारांना योग्य प्रतिसाद देऊ शकत नसल्याचे ANI वृत्त संस्थेने सांगितले आहे. दरम्यान आज गुरुवारी सकाळी विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले आणि मुलगी यांनी दिलेल्या हेल्थ अपडेटनुसार, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र त्याची तब्येत प्रचंड अस्थिर आहे. तरीही अनेक न्यूज पोर्टलने निधन वार्ता जाहीर केल्यामुळे अफवांना वेग आला आहे. कुणीही या अफवांवर विश्वास ठेवू नये.
#VikramGokhale is critical since the last 24 hours. Doctors are trying their best. He is not responding to the treatment as expected. He has multiple organ failures: Vrushali Gokhale, Vikram Gokhale's wife
(File photo) pic.twitter.com/wxh9VgUIVI
— ANI (@ANI) November 24, 2022
अभिनेता अली गोनी, अजय देवगण, मधुर भांडारकर, कमाल आर खान यांसारख्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर विक्रम गोखले यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारे ट्विट शेअर केले होते. शिवाय DNA, TOI यांसारख्या वृत्त संस्थांनी देखील निधन वार्ता जाहीर केली होती. यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. नुकतीच ANI ने दिलेल्या माहितीनुसार, विक्रम गोखले हे कोणत्याही उपचारांना प्रतिसाद देत नसून, त्यांचे अनेक अवयव निकामी होऊ लागले आहेत. तरीही डॉक्टर त्यांच्या बचावासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.
Discussion about this post