हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात बिग बॉसने खेळी टाकत किरण माने यांना स्पर्धकांसाठी घराबाहेर काढून सिक्रेट रूममध्ये ठेवले. यांनतर काल किरण माने घरात रिएंटर झाले आणि सगळी गणितंच त्यांनी बदलली. किरण येताच अमृता धोंगडे आणि तेजस्विनीमध्ये पहिलं भांडण झालं. यावेळी अमृता म्हणाली कि, घरात सगळ्यात सेफ गेम खेळणारी व्यक्ती म्हणजे ‘तेजस्विनी लोणारी’. यावर तेजस्विनी म्हणाली, ‘माझी चूक होते मी तुझ्याकडे नेहेमी येते…’ घरात परतल्यापासून मानेंनी सदस्यांना दिलेल्या १ ते १० या क्रमवारीनुसार त्यांची जागा दाखवून दिली आणि बिग बॉसने जाहीर केले कि या १ ते ५ क्रमावर असलेल्या सदस्यांना कॅप्टन पदाची उमेदवारी मिळतेय.
मानेंनी निवडल्यानुसार, तेजस्विनी, रोहित, विकास, अपूर्वा आणि समृद्धी यांना कॅप्टन्सीची उमेदवारी मिळाली. यातून विकास आणि समृद्धी गेल्या भागात बाहेर झाले. यानंतर आता अपूर्वा आणि तेजस्विनीमध्ये जोरात लढत झाली. कॅप्टन्सीचं कार्य त्यांनी टास्क कमी आणि युद्ध म्हणून जास्त खेळण्याचं मनावर घेतलं आहे. दरम्यान त्यांच्यात बाचाबाची सुद्धा झाली. ‘युध्द्व कॅप्टन्सीचे’ हे कॅप्टन्सी कार्य आता कोण जिंकतंय हे पाहायचं आहे. पण तोपर्यंत माने कॅप्टन म्हणून घराचा कार्यभार सांभाळतील असे बिग बॉसने जाहीर केले आहे.
या कार्यादरम्यान अपूर्वा आणि तेजस्विनी एकमेकींसोबत भिडल्या. रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो कि अपूर्वा म्हणते, ‘एकच स्ट्रॅटेजी आहे आयुष्यभर डिस्ट्रॉय…’ त्यावर तेजस्विनी म्हणाली, ‘तोंड सांभाळ तुझं…’ तर अपूर्वा म्हणाली, ‘चिटर आहे चिटर तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.’ तर तेजस्विनी म्हणाली, ‘हिडीस बाई दिसते आहे, गप्प बस.’ यावर अपूर्वा म्हणाली, ‘तू म्हणजे, ‘मी नाही त्यातली, कडी लाव आतली.. अशी आहेस..’ आता भांडण काय आणि किती विकोपाला जातं हे आजच्या भागात कळेल. शिवाय घराला नवा कॅप्टन म्हणून कोण मिळणार हे देखील आज कळेल.
Discussion about this post