हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. शिवाय तिची मराठी सिनेसृष्टीतील कारकीर्द पाहता तिचा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या मोहक अदा आणि सौंदयामुळे चर्चेत असणारी मानसी गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत आली आहे. ती आणि तिचा पती प्रदीप खरेरा हे एकमेकांपासून विभक्त होत असून याबाबत स्वतः मानसी नाईकने अधिकृत भाष्य केले आहे. आतापर्यंत फक्त मानसी यावर बोलताना दिसली. मात्र आता प्रदीपने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत मानसीला टोला लगावला आहे.
अभिनेत्री मानसी नाईकने तिचा पती प्रदीप खरेरा याच्यापासून विभक्त होण्यासाठी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. यावर घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान तिने प्रदीपवर फसवणुकीचा दावा केल्याचे सांगितले जात आहे. आता अशातच तिच्या नवऱ्याची एक पोस्ट चर्चेत आली आहे. मानसी इतकाच प्रदीपदेखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्यामुळे तोही विविध पोस्ट शेअर करताना दिसतो. त्याने नुकताच एक फोटो शेअर केला आहे आणि त्यासोबत जे कॅप्शन दिले आहे, त्या कॅप्शनमुळे तो प्रचंड चर्चेत आला आहे.
या पोस्टसह त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘लोक आपलयाविषयी काय विचार करतात याने मला काहीही फरक पडत नाही, कारण मला माहितेय मी कोण आहे आणि याचा मला अभिमान आहे.’ हि पोस्ट एका प्रकारे मानसी नाईकच्या आरोपांना प्रत्युत्तर असल्याचे भासते आहे. अभिनेत्री मानसी नाईक आणि बॉक्सर प्रदीप खरेरा यांनी १९ जानेवारी २०२१ मध्ये लग्न केलं होत. लग्नाआधीचा काही काळ एकत्र घालवल्यानंतर त्यांनी लग्न केले होते. लग्नानंतर सगळं अलबेल असेल असंच वाटत होत. रोज नवी व्हिडीओ, नवे फोटो हे या दांपत्याचे व्हायरल होत असे. पण अचानक काही बिघडलं आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
Discussion about this post