हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बुधवारी रात्रीपासून सर्वत्र विक्रम गोखले यांच्या तब्येतीविषयी बोलले जात आहे. कुणी म्हणतंय ते कोमात आहेत, कुणी म्हणताय घशाच्या त्रासाने त्रस्त आहेत, कुणी म्हणतंय व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत, तर कुणी म्हणतंय त्यांना देवाज्ञा झाली. अगदी सिनेसृष्टीतील त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. यानंतर गोखले कुटुंबीय आणि मंगेशकर रुग्णालयाने अधिकृत माहिती जारी केली. गुरुवारी त्यांची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक होती मात्र आज त्याच्या तब्येतीबाबत मोठी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
Pune, Maharashtra | Actor Vikram Gokhle's health is improving, is showing slow but steady improvement. He is opening his eyes, moving his limbs & likely to be off ventilator support in next 48 hours. His BP and heart are stable: PRO Shirish Yadgikar, Deenanath Mangeshkar Hospital pic.twitter.com/911acD7dy5
— ANI (@ANI) November 25, 2022
गेल्या काही तासांमध्ये विक्रम गोखले यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. शिवाय ते डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देऊ लागल्यामुळे आता चिंतेचे कारण नाही असेही त्यांनी सांगितले. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. गोखले असेच प्रतिसाद देत राहिले तर येत्या ४८ तासांत त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढणार असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या हातापायाची काहीशी हालचाल देखील झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मेडिकल बुलेटिन देताना दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी हि माहिती दिली आहे.
अभिनेता विक्रम गोखले हे ५ नोव्हेंबर २०२२ पासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल असून २३ नोव्हेंबर, बुधवारपासून त्यांची तब्येत खालावली होती. ‘गेल्या २४ तासांपासून त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असून ते उपचाराला म्हणावा तसा प्रतिसाद देऊ शकत नाहीयेत. त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाहीये’, अशी माहिती गुरुवारी गोखले यांचे कौटुंबिक मित्र राजेश यांनी दिली होती. मात्र आता ‘विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा. ते डोळे उघडत आहेत, हातपाय हलवत आहेत, आणि पुढच्या ४८ तासांत त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढला जाण्याची शक्यता आहे. त्यांचा रक्तदाब आणि हृदय स्थिर आहे.’ अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. यामुळे चाहत्यांमध्ये दिलासाजनक वातावरण आहे. तरीही पुढचे ४८ तास अटीतटीचे आहेत.
Discussion about this post