हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या एकदम जोमात सुरु आहे. शाहिरांची गाथा, त्यांचे जीवन सरल आणि सोप्या पद्धतीने केदार शिंदे आणि संपूर्ण ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची टीम प्रचंड मेहनत घेत आहे. आज दिनांक २५ नोव्हेंबर असून आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा स्मृती दिन आहे. या निमित्त केदार शिंदे यांनी ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात यशवंतराव यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या चेहऱ्यावरील पडदा हटवला आहे आणि पोस्टर रिलीज केले आहे.
केदार शिंदे यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पार पडल्यावर महाराष्ट्राचा मंगल कलश घेऊन आले असे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण.. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत ज्यांच्या समोर पहिल्यांदा सादर झालं असं धोरणी व्यक्तिमत्त्व यशवंतराव चव्हाण.. हे सारं असूनही शाहीर साबळे आणि यशवंतराव ह्यांचं नातं राजकारणाच्या ही पलीकडचं होतं.. हेच नातं उलगडणार २८ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र शाहीर ह्या सिनेमात.. आज यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे खास पोस्टर..यशवंतरावांच्या भूमिकेत आहेत.. श्री. अतुल काळे’
सध्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून केदार शिंदे प्रत्येक लहान अपडेट त्यांच्या सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून देत आहेत. सध्या हे चित्रीकरण मुंबईतील शेड्युलच्या अंतिम टप्प्यात आहे. याबाबत पोस्ट शेअर करताना केदार शिंदेनी एक व्हिडीओ शेअर केला होता. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते कि, महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक, छायाचित्रकार, पडद्यामागची मंडळी, एकंदरीत संपूर्ण टीम जोमाने मुंबई शेड्यूल पूर्ण करीत आहे. त्याचीच ही चित्रफीत. शाहिरांचा जनतेला ज्ञात आणि अज्ञात असलेला जीवनपट ‘महाराष्ट्र शाहीर’ प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे, २८ एप्रिल २०२३ पासून चित्रपटगृहात!’
Discussion about this post