Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS 16: स्वतःची पोरगी तर सांभाळता येत नाहीये..; सुंबुलच्या वडिलांचे आरोप ऐकून टीना भडकली

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 25, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
110
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १६ मध्ये पहिल्या आठवड्यापासून एक लव्ह ट्रँगल तयार होताना दिसला. हा लव्ह ट्रँगल होता सुंबुल- शालीन- टीना यांचा. पण गेल्या काही आठवड्यांपासून शालीन आणि टिनाची वाढती जवळीक आणि सुंबुलच्या शालीनप्रती असणाऱ्या उत्स्फूर्त भावना काही वेगळ्याच ढंगाने समोर येत होत्या. ज्यामुळे कितीतरी वेळा सुंबुलच्या वयाचा विचार करून तिला जो तो समजावताना दिसला. तिचे वडील, शो होस्ट सलमान खान, घरातील सदस्य आणि खुद्द बिग बॉसने देखील तिला समजावले. पण तिच्या कृतीतून वारंवार चुकीचे संदेश बाहेर येत होते. दरम्यान या गोष्टीचा दोष तिच्या वडिलांनी शालीन आणि टीनाला देत काही अपशब्दांचा प्रयोग केला. यावरून टीना भडकली आणि तिने बीबी हाऊसमधूनच सुंबुलच्या वडिलांचा समाचार घेतला.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

अलीकडच्या भागात सुंबुलच्या वडिलांची तब्येत खराब असल्यामुळे बिग बॉसने त्यांचा संवाद घडवून आणला. ज्या संवादात तब्येतीविषयी कमी आणि घरातील विषयांवर जास्त बोलले गेले. ज्यामुळे बिग बॉसच्या काही महत्वपूर्ण नियमांचे उल्लंघन झाले. याकरिता बिग बॉसने घरातील सदस्यांना एकत्र करून सुंबुल आणि तिच्या वडिलांमध्ये झालेला संवाद पूर्ण ऐकवला. गुरुवारच्या भागात हा संवाद ऐकल्यानंतर शालीन आणि टीना यांच्या संतापाचा पारा प्रचंड वाढल्याचे दिसून आले. शालिनने सुंबुलला स्वतःपासून लांब राहण्याची ताकीद दिली तर टिनाने सुंबुलसह तिच्या वडिलांचाही चांगलाच समाचार घेतला.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

यावेळी टीना बोलताना दिसली, ‘ज्या प्रकारे तुम्ही एक बाप म्हणून स्वतःच्या मुलीसाठी एव्हढं पोट तिडकीने बोलताय, आम्हाला शिव्या देताय ते सगळं आमचे पालकदेखील करू शकतात. पण ते करत नाहीत कारण त्यांना मर्यादा माहित आहेत. नॅशनल टेलिव्हिजनवर तुम्ही तुमच्या मुलीला योग्य दाखवण्यासाठी माझं चरित्र खराब का करताय..? तुमच्यासाठी माझ्याकडे आता काहीही मान सन्मान राहिलेला नाही. स्वतःची पोरगी तर सांभाळता येत नाहीये… आणि दुसऱ्यांच्या पोरींवर बोटं उचलतायत.. नॅशनल टेलिव्हिजनवर शिव्या देतायत.’ अशा प्रकारे टिनाने तिचा संताप व्यक्त केला आहे. यानंतर आता घरात सुंबुलचा मित्र फहमान खान वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून प्रवेश करणार आहे. त्यामुळे पुढे काय होणार हे पाहणे मोठे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Tags: Bigg Boss 16Shalin BhanotSumbul Touqueer KhanTina DuttaViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group