Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आपली मुलं BIGG BOSS’मध्ये गेलीयेत शाळेत नाही; सलमान समोरचं भिडले स्पर्धकांचे माता- पिता

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 26, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
92
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉसच्या १६ व्या पर्वात सध्या स्पर्धकांसारखेच त्यांच्या पालकांमध्ये देखील घमासान शाब्दिक युद्ध चालू आहे. शालीन भनोतचे आई बाबा, टिना दत्ताची आई आणि सुंबुलचे बाबा बिग बॉसच्या शनिवार का वारमध्ये एकमेकांसोबत एका गहन विषयावर बोलताना दिसणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

शालीन, टीना आणि सुंबुल यांचं एक लव्ह ट्रँगल असल्याचे वारंवार घरात आणि घराबाहेर बोलले जात आहे. सुंबुलची छबी जी काही दिसत आहे त्यासाठी टीना आणि शालीन जबाबदार असल्याचे तिचे वडील सतत बोलत आले आहेत. या आरोपांचे प्रत्युत्तर देण्यासाठी आता टीना आणि शालीनचे आईवडील देखील समोर आले आहेत.

#SumbulTouqeerKhan has a major breakdown after an argument with #ShalinBhanot & #TinaDatta.#BiggBoss #biggboss16 pic.twitter.com/yIsgqCwRHe

— Endemol Shine India (@EndemolShineIND) November 24, 2022

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये दिसतंय कि, शो होस्ट सलमान खानसमोर तिन्ही स्पर्धकांचे पालक बसलेले आहेत. सुंबुलच्या वडिलांनी मेडिकल प्रॉब्लेम दाखवून सुंबुलला बाहेरील गोष्टींची कल्पना देत घरातील सदस्यांसोबत कसं वागायचं आहे हे सांगण्यासाठी संपर्क साधला. हा संवाद नियमबाह्य असल्यामुळे बिग बॉसने तो घरातील सर्व सदस्यांना दाखवला आणि यानंतर घरात जोरदार भांडण झाली.

#SumbulTouqeer's father has THIS to say after his call with Sumbul in the #BiggBoss16 house.
WATCH! 👇🏻 pic.twitter.com/MTza1kRLWQ

— Pinkvilla Telly (@PinkvillaTelly) November 24, 2022

सुंबुलच्या वडिलांनी टीना आणि शालिनसाठी काही चुकीचे शब्द देखील वापरले ज्यामुळे त्यांचे पालकही संतापले आहेत. या शब्द प्रयोगांसाठी सुंबुलच्या वडिलांनी माध्यमांच्या मार्फत नॅशनल टीव्हीवर माफीदेखील मागितली आहे. मात्र पालक म्हणून शालीन आणि टिनाच्या पालकांचा संताप दुर्लक्षित करता येणार नाही. म्हणूनच हा संताप व्यक्त करण्यासाठी आणि आपले मुद्दे मांडण्यासाठी त्यांना बिग बॉसच्या शनिवार का वार मध्ये बोलावण्यात आले.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

यावेळी सुंबुलचे वडील शालीन आणि टिनाच्या पालकांकडून माफीची अपेक्षा करत आहेत. मात्र टिनाची आई संतापात म्हणते कि, का मागायची माफी..? इथे काय फक्त तुम्ही, तुमची मुलगी बरोबर आणि आम्ही सगळे चुकीचे आहोत का..? आपण आपल्या मुलांना बिग बॉसमध्ये पाठवलं आहे शाळेत नाही.’ तर शालिनचे पालक सुंबुलच्या वडिलांवर तिचा रिमोट कंट्रोल घेऊन बसल्याचा आरोप करतात. यावेळी सुंबुलच्या वडिलांनी वापरलेल्या शब्दांसाठी शो होस्ट म्हणून सलमानची काय भूमिका असेल हे पाहणे महत्वाचे ठरेल. शिवाय पालकांमधील हा संवाद सुसंवाद होईल कि विकोपाला जाईल हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags: Bigg Boss 16Colors TVShalin BhanotSumbul Touqueer KhanTina DuttaViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group