Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तुला ती दिसली ना..?’; ‘व्हिक्टोरिया’चा क्षणात थरकाप उडविणारा ट्रेलर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 29, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Victoria
0
SHARES
67
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीचा वेगळा असा प्रेक्षक वर्ग आहे. जो नेहमी निर्मात्यांकडून काहीतरी वेगळं अपेक्षित करत असतो. त्यामुळे प्रेक्षकांच्या मर्जीप्रमाणे त्यांच्या मनोरंजनासाठी नेहमी काहीतरी हटके देणं हि निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांची जबाबदारी असते. याच भावनेला समजून अभिनेता विराजस कुलकर्णी याने आपला पहिला चित्रपट ‘व्हिक्टोरिया’ बनवलाय. या चित्रपटात एक रहस्य आहे आणि सोबतच भीतीदायक बोचणारी शांतता. या चित्रपटाच्या पहिल्या लुकपासून चित्रपट चर्चेत आहे. यानंतर आता मात्र चित्रपटाच्या ट्रेलरने सगळ्यांचीच झोप उडवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Pushkar Suhas Jog (@jogpushkar)

या ट्रेलरमध्ये, लंडनमधील भव्य एक आलिशान हॉटेल ‘व्हिक्टोरिया’मध्ये आपलं स्वागत केलं जात. ज्याच्या आसपास भीतीचे वातावरण अगदी गूढ पद्धतीने पसरले आहे. या हॉटेलमध्ये पाहुणे म्हणून सोनाली आणि आशय येतात. दरम्यान त्यांना आपल्या आसपास कुणी असल्याचा भास होतो.

View this post on Instagram

A post shared by Pushkar Suhas Jog (@jogpushkar)

ते हॉटेलच्या एका बंधनात्मक भागात जातात आणि पुष्कर त्यांना मागून आवाज देतो. इथे काही सेकंदासाठी हृदयाची धडधड वाढते. पुढे हॉटेलमध्ये खून झालेल्या रेणुकाबद्दल वारंवार ऐकू येत. पण ती नक्की कोण आहे..? तिचा हॉटेलशी काय संबंध? आणि तिला कुणी व का मारलं..? याची उत्तर मिळत नाहीत. हि रेणुकाच सोनालीचा भास असेल का..? असे अनेक प्रश्न हा ट्रेलर निर्माण करतो.

View this post on Instagram

A post shared by Pushkar Suhas Jog (@jogpushkar)

ट्रेलरच्या अधेमध्ये एक विचित्र सावली दाखवली आहे. जी सोनालीला त्रास देतेय. शेवटच्या फ्रेममध्ये हि सावली सोनालीचा हात धरते आणि इथून काळीज बंद पडत का काय..? असेच वाटेल. या ट्रेलरने अंगावर काटा आणलाच शिवाय उत्सुकता दहा पटीने वाढवली आहे. हा चित्रपट येत्या १६ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होतोय. आनंद पंडित, रूपा पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर विराजसने दिग्दर्शन केले आहे. यामध्ये सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग आणि आशय कुलकर्णी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Tags: Aashay KulkarniInstagram PostOfficial TrailerPushkar Jogsonalee kulkarniUpcoming Marathi MovieVictoriaVirajas Kulkarni
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group