Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अस्सल कलाकार! ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटासाठी सायली आणि सुव्रतने केली ‘ही’ गोष्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 29, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Eka Paithanichi Goshta
0
SHARES
606
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण साकारत असलेल्या आपल्या व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय देण्यासाठी एखादा कलाकार शक्य ते सर्व प्रयत्न करत असतो. त्या भूमिकेचा अभ्यास करण्यापासून ते ती भूमिका जगण्यापर्यंत या कलाकारांचा प्रवास सुरु असतो. असेच शर्थीचे प्रयत्न करून सायली संजीव आणि सुव्रत जोशीने ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटातील भूमिका साकारल्या आहेत. शंतनू रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’मध्ये सायलीने शिवणकाम करण्याऱ्या गृहिणीची भूमिका साकारली आहे. तर सुव्रतने फुलवाल्याची. या भूमिका दिसताना साध्या मात्र साकारताना अवघड होत्या. म्हणूनच या भूमिकांसाठी दोघांनीही अभ्यास केला. ज्यामुळे या व्यक्तिरेखा ज्या त्या पात्रासोबत तंतोतंत जुळून आल्या.

View this post on Instagram

A post shared by Sula (@suvratjoshi)

कोणतीही भूमिका साकारताना आपल्याला त्या भूमिकेशी एकरूप व्हायला आवडतं हे सांगताना सायलीने काही खास गोष्टींवर जोर दिलाय. ती सांगते, ‘या चित्रपटात मी शिवणकाम करणारी साधी गृहिणी आहे. जी आजूबाजूच्या बायकांच्या साड्यांना फॉल बिडिंग करून देते, ब्लाऊज शिवून देते. अभिनयाच्या जोरावर ही भूमिका नक्कीच साकारता आली असती. परंतु त्यात नैसर्गिकता आणण्यासाठी, त्या भूमिकेशी एकरूप होण्यासाठी मी दोन दिवसांचा शिवण क्लास लावला.

‘गोष्ट एका पैठणीची’मध्ये मी अतिशय जुन्या काळातील मशीनवर काम करतेय. त्यामुळे मला शिलाई मशीन हाताळणे, सुईमध्ये दोरा भरणे, तेल टाकणे या सगळ्या गोष्टी माहित असणे, गरजचे होते. कुठेही माझा अभिनय अनैसर्गिक वाटू नये, असे मला मनापासून वाटत होते. म्हणूनच कोणालाही कळू न देता मी हा क्लास लावला होता. ज्यामुळे मला शिवणकामातील बारकावे शिकता आले. ज्याचा मला ‘गोष्ट एका पैठणीची’मध्ये फायदा झाला. मुळात कोणतीही भूमिका साकारताना त्यात मन ओतून काम केले तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.’

तर कोणतीही भूमिका साकारताना त्या भूमिकेचा अभ्यास करणे महत्वाचे आहे हे सांगताना सुव्रतने सांगितले कि, ‘मी एका फुलवाल्याची भूमिका साकारत आहे. वरवर पाहता या भूमिका अगदी सहज करता येण्यासारख्या असल्या तरी यासाठी निरीक्षण आवश्यक आहे. गजरे, हार विणण्याची पद्धत, हाताच्या हालचाली या सगळ्याच गोष्टी आत्मसाद करायच्या होत्या. म्हणूनच मी तासनतास फुलवाल्यांच्या बाजूला उभं राहून त्यांचे निरीक्षण करायचो. जेणे करून ती व्यक्तिरेखा साकारताना त्यात सहजता यावी.’

View this post on Instagram

A post shared by Planet Marathi प्लॅनेट मराठी (@planet.marathi)

‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता यांनी केली असून अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती-विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे सहनिर्माते आहेत. मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता अक्षय विलास बर्दापूरकर, पियुष सिंग, गोल्डन रेशो फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी, लेकसाइड प्रॉडक्शन आहेत. तर सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, अदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट येत्या २ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Tags: Gosht Eka PaithanichiInstagram PostPlanet MarathiSayali SanjeevSuvrat Joshi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group