Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘प्रेमाचा अर्थ तेव्हाच कळतो जेव्हा..,’; रितेश- जियाचे ‘वेड’ लावणारे रोमँटिक गाणे रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 29, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ved Tuza
0
SHARES
222
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीचा लाडका अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ज्याचे नाव ‘वेड’ असे आहे. या चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे आणि या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. रितेशने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर या गाण्याची केवळ झलक शेअर केली आहे तर युट्युबवर हे गाणे पूर्ण उपलब्ध आहे.

 

रितेशने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर ‘वेड’ या चित्रपटाचा टिझर शेअर केल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी विशेष उत्सुकता आहे. यानंतर आता पहिले आणि रोमँटिक गाणे रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी या गाण्यावर पसंतीची मोहोर उमटवली आहे. या गाण्याच्या ओळींमध्ये प्रेमातील वेड आहेच पण ऐकणारा या गाण्यात प्रेमात वेडा होईल हे नक्की.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

कारण या गाण्यात एकतर रितेश देशमुख आणि जिया शंकर रोमांन्स करतांना दिसत आहे. याहून मोठे कारण असे कि, हे गाणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जोडी अजय- अतुलने संगीतबद्ध केले आहे. तसेच गाण्याचे बोल अजय-अतुल आणि गुरु ठाकूर यांचे आहेत.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

सोशल मीडियावर या गाण्याची झलक शेअर करताना रितेशने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘प्रेमाचा अर्थ तेव्हाच कळतो जेव्हा तुम्ही त्यातला वेडेपणा अनुभवता, सादर करतो आहे आमच्या सिनेमातलं पहिलं गाणं ‘वेड तुझा’. दरम्यानं, ‘वेड तुझा’ हे या चित्रपटाचे टायटल सॉंग आहे.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

वेड चित्रपटातील गाणे आणि चित्रपट हिट होइल असे रितेशचे चाहते म्हणत आहेत. तब्बल १० वर्षांनंतर रितेश आणि जिनिलिया मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाच्या प्रदार्शनाबाबत मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटाद्वारे रितेश दिग्दर्शन क्षेत्रात तर जिनिलिया मराठी सिने सृष्टीत पदार्पण करत आहे. हा चित्रपट येत्या ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होतोय.

Tags: First Song ReleasedGenelia D'souza DeshmukhInstagram PostRiteish deshmukhUpcoming Marathi MovieVed
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group