Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिका संपणार पण..,; स्टार प्रवाह वाहिनीने घेतला मोठा निर्णय

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 30, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Phulala Sugandh Maticha
0
SHARES
4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘फुलाला सुगंध मातीचा’ आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या कथानकासह पात्रांवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं. त्यामुळे मालिकेचा निरोप घेणं इतकं सोप्प नक्कीच नाहीये. मालिकेतील मुख्य नायक शुभम, नायिका किर्ती, शिवाय जिजि आक्का अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहेत. त्यामुळे या मालिकेला निरोप देताना त्यांचा जीव कासावीस होणे साहजिक आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हि मालिका संपणार असल्याचे बोलले जात असताना अनेकदा प्रेक्षकांनी मालिका संपवू नये अशी इच्छा व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. पण शेवटी कथानकचं ते. कुठेतरी थांबायलाच लागणार.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आतापर्यंत मालिका सुरु आहे त्यानुसार, काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं शुभम आणि जिजि आक्का यांच्या बसला दहशतवादी घेरतात. या दरम्यान त्यांना बंदी बनवले जाते आणि हल्ल्यात शुभमचा स्मृतिभ्रंश होतो. याचा फायदा घेऊन जिजि आक्का किर्तीला घराबाहेर काढतात. पण कीर्ती शुभमला मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहते. शेवटी ती त्यांची शेजारी म्हणून राहू लागते. शुभमला कामात मदत करते. पण जिजि आक्का तीला विरोध करतात आणि शुभमचं दुसरं लग्न लावायचं प्लॅनिंग करतात. जे जवळजवळ यशस्वी होणार असतं. इतक्यात मालिकेत उत्कंठावर्धक वळण येते. किर्ती शुभमला कसं मिळवणार..? हे सांगणारा मालिकेचा गोड शेवट ४ डिसेंबर २०२२ रोजी विशेष भागात पाहता येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

मालिका संपणार… पण प्रेक्षकांना नाराज करायचं नाही म्हणून लोकाग्रहास्तव या मालिकेचं पुन:प्रसारण करण्यात येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर ५ डिसेंबर २०२२ पासून सायंकाळी ६ वाजता फुलाला सुगंध मातीचा हि मालिका पहिल्या भागापासून पुन्हा प्रेक्षेपित होणार आहे. याबाबत बोलताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले कि, ‘ही मालिका स्टार प्रवाहच्या यशस्वी मालिकांपैकी एक आहे. सुंदर कथा, पटकथा, अभिनय आणि दिग्दर्शन यामुळे ही मालिका रसिकांच्या मनात कायम घर करुन राहिल. प्रत्येक कथेला एक छान शेवट असतो. या मालिकेची गोष्ट आणि पात्रांचा प्रवास सुंदररित्या संपतोय. मालिका संपू नये ही रसिक प्रेक्षकांची मागणी हेच सिद्ध करतेय की ही मालिका जिंकलीय. म्हणूनच आपण ती पुनः प्रसारित करणार आहोत.’

Tags: Instagram Postmarathi serialPhulala Sugandh Matichastar pravahViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group