Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS’च्या घरात असूनही किरण माने फेसबुकवर सक्रिय; नियमांचे उल्लंघन कि प्रेक्षकांची फसवणूक..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 1, 2022
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BBM4
0
SHARES
326
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. या घरातील सदस्य रोज नवे धक्के काही सुखद काही दुःखद एकमेकांच्या साथीने पचवत आहेत. अशातच बिग बॉसच्या घरात विजेतेपदाची सक्षम दावेदार म्हणून ओळखली जाणारी तेजस्विनी लोणारी तिच्या हाताला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे घराबाहेर पडली. या गोष्टीचे बिग बॉसला आणि घरातील सर्व स्पर्धकांना फार दुःख झाले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी अभिनेते किरण माने यांनी तिच्यासाठी एक भावनिक पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. आपण सारेच जाणतो कि किरण माने सोशल मीडियावर सक्रिय असतात. पण बिग बॉसच्या घरातही ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत..? क्लिप्स किंवा इतर पोस्ट कुणी इतर शेअर करेल पण भावना..? ते इतर कुणी कसं काय शेअर करेल.?

किरण माने यांनी सोशल मीडियावर भलं मोठं पत्र लिहून तेजस्विनी लोणारच्या एक्झिटचे दुःख व्यक्त केले आहे. पण प्रश्न हा आहे कि, हे दुःख व्यक्त करण्यासाठी त्यांना सोशल मीडिया वापरण्याची संधी मिळाली कशी..? आपल्याला माहित असल्याप्रमाणे बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या स्पर्धकांना बाहेरील जगाशी संबंध ठेवता येत नाही. केवळ घरातील सदस्य, घरातील मुद्दे आणि बिग बॉसचा खेळ एव्हढंच ३ महिने त्यांना माहित असणे बंधनकारक आहे. घरात बाहेरील मुद्दे बोलता येत नाहीत. बाहेरून येणाऱ्याला बाहेर काय चाललंय हे विचारायचं नाही. मग घरात राहून सोशल मीडिया जर हे कलाकार वापरत असतील.. तर यांना खरंच घराबाहेर काय चालू आहे हे माहित नाही का..?

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmane7777)

या प्रकारामुळे एकंदरच घरातील सदस्यांना खुली मोकळीक असून प्रेक्षकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम चालू आहे हे स्पष्ट दिसत आहे. जर हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करू शकतात तर नक्कीचं हे मोबाईल वापरत आहेत. अनेकदा घरातील सदस्यांचे घरातील नवनवीन लूकचे फोटो सोशल मीडियावर ते शेअर करत असतात. पण कसं..? ज्यांच्याकडे तर मोबाईल नाही. मग ते आपले फोटो आणि लूक कसा काय शेअर करतात..? बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनमध्ये स्नेहा वाघ घरात असतानाच अनेक फोटो शेअर करताना दिसायची. यामुळे घरातील स्पर्धक मोबाईल सारखे साधन वापरत असल्याची शंका अनेकांनी व्यक्त केली होती. पण मेकर्सने याबाबत कधीही अधिकृत विधान केलेले नाही. उलट आपण नियमांबाबत कडक असल्याचे त्यांनी नेहमीच सांगितले. मग आता किरण माने यांनी हि पोस्ट शेअर कशी केली..? याबाबत मेकर्सने खुलासा करायला हवा असे अनेकांना वाटत आहे.

Tags: Bigg Boss Marathi 4colors marathiFacebook PostKiran ManeSocial Medial Postviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group