हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसचा १६ वा सीजन तर कमाल सुरु आहे. यात काही वादच नाही. या घरात अनेक कपल्स पहायला मिळाले. काही घरात नवे नवे ताजे ताजे तयार झाले. तर कुणी बाहेरूनच आपला साथीदार घेऊन गेल्याचे दिसले. होय आपण प्रियांका आणि अंकित बद्दलच बोलत आहोत. हे कपलं मालिका विश्वातील लोकप्रिय कपल आहे. बिग बॉसच्या घरातही बराच काळ हे कपल स्वीट कपलं म्हणून चर्चेत राहील. प्रेक्षकांनी याना भरपूर प्रेम दिलं. पण गेल्या काही काळापासून त्यांच्यात काही बरं चाललंय असं काही दिसलंच नाही. त्यात आता एका टास्कमुळे यांचं रिलेशन टिकेल याची काही शाश्वती राहिलेली नाही.
कलर्स टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये बिग बॉसने घरातील स्पर्धकांना मनात साचवून ठेवलेली घाण, राग, द्वेष बाहेर काढून टाकण्याची एक संधी देत एक कमाल टास्क दिला. पण या कमाल टास्कने तर घरात बवाल केलाय. बिग बॉसच्या घरातलं प्रेक्षकांचं लाडकं आणि आवडत कपलं प्रियांका आणि अंकित यांच्यात वादाची जबरदस्त ठिणगी या टास्कमध्ये पडली. व्हायरल प्रोमोमध्ये प्रियांकाला अंकित तिच्या मागे काय बोलला हे समजलं आणि तिचा पारा चढला. आपला पार्टनर आपल्या मागे वाईट बोलतो हे तिला सहनच झालं नाही आणि ती चिडचिड करू लागली.
टास्कमध्ये झालेला प्रकार प्रियांकासाठी असह्य झाला आणि ती प्रचंड संतापली. यावरून ती अंकितला बडबडू लागली. दरम्यान अंकित बराचवेळ शांत होता. पण सौंदर्याने त्याची बाजू घेतली आणि प्रियांकाला बॅक फायर केले. तर प्रियंकाने तू आमच्या मध्ये पडू नको म्हणत तिला बजावलं. यानंतर अंकित बराचवेळ प्रियंकाला आपण यावर बसून शांतपणे बोलूया म्हणताना दिसला. पण प्रियांका त्याच काही ऐकायला तयारंच नव्हती. त्यांच्यात पुन्हा आणि पुन्हा फक्त भांडणंच होत राहील. ज्यामुळे आता त्यांच्या चाहत्यांना हे नातं तुटतं का काय..? अशी भीती वाटू लागली आहे.
Discussion about this post