हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘दार उघड बये’ ही मालिका सुरु आहे. अगदी अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेतील प्रत्येक ट्विस्ट प्रेक्षकांना आवडतो आहे. त्यामुळे हि मालिका सतत चर्चेत असते. या मालिकेत पुरुषी अहंकाराने भरलेल्या रावसाहेब नगरकरांच्या भूमिकेत अभिनेते शरद पोंक्षे दिसत आहेत. महिलांना तुच्छ आणि कमी लेखणाऱ्या या पात्राच्या भूमिकेसह हि मालिका एका विशिष्ट वळणावर येऊन ठेपली आहे. येत्या भागात शरद पोंक्षे स्त्री वेशात दिसणार आहेत. त्यामुळे पुढील भागांची आणखीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
आतापर्यंत मालिकेत आंतरजातीय विवाह केल्यामूळे रावसाहेबांनी मुलगा सारंग आणि सुन मुक्ताला घरातून हाकलून दिलं होत. पण मुक्ता सारंगचा गृहप्रवेश होतोच आणि यावेळी रावसाहेब मुक्ताच्या पावलांचा ठसा असलेलं कापड जाळून टाकतात. शिवाय सारंगच्या आईला म्हणजेच वैजयंतीला सारंग आणि मुक्ताला भेटू देत नाहीत. दुसरीकडे आर्याचे आई बाबा नगरकरांच्या घरी येतात आणि रावसाहेब त्यांना शब्द देतात की आर्याच नगरकरांची सून म्हणून घरात दिसेल. आणि तसं झालं नाही तर मी स्वतः रावसाहेब बाईचा वेश घालून हातात बांगड्या भरून दिवसभर घरात फिरेन.
यावेळी आपला शब्द खरा करण्यासाठी रावसाहेब मुक्ता आणि सारंगला प्रचंड त्रास देताना दिसतील. नवनवीन आव्हानं उभी करतील. पण मुक्ता सारंगच्या साथीने त्यांना सडेतोड उत्तर देऊन सगळी संकटं पार करेल. यामुळे रावसाहेबांचा पुरुषी अहंकार दुखावेल आणि मग ते अतिशय खालच्या पातळीला उतरताना दिसतील. पण या सगळ्याचा मोठा परिणाम होताना दिसेल. हे वचन दिल्यापासून राव साहेब स्वतःला स्त्री वेशात वावरताना पाहत आहेत. रावसाहेब स्वतःला घरातल्यांसमोर बाईच्या वेशात हातात बांगड्या घालून फिरताना दिसतील. बाईच्या वेशात स्वतःला ते आरशात बघतील. यामूळे मालिकेला एक विशेष आणि वेगळे वळण येणार आहे.
Discussion about this post