हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय हरहुन्नरी बहुरूपी कलाकार म्हणून प्रसाद ओकची ख्याती आहे. तो स्वतः एक उत्तम अभिनेता आहेच. सोबतच तो उत्तम दिग्दर्शक आणि लेखकदेखील आहे. यामुळे तो नेहमीच चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय दिसत आहे. विविध लूक आणि व्हिडिओच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे. पत्नी मंजिरी ओकसोबत तो असे विविध प्रयोग करताना दिसतो आणि शेअरदेखील करतो. पण सध्या त्याने शेअर केलेला हा व्हिडीओ चर्चेत आहे. व्हिडिओहून जास्त त्याच कॅप्शन चर्चेत आलंय.
प्रसाद ओकने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना हा प्रश्न विचारला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे कि, ‘काही चुकलं का माझं?’ सगळ्यात आधी नुसता प्रश्न वाचला तर कुणीही नेमकं काय बोलू या विचाराने हैराण होईल. काहीसा चिंतेत पडेल. पण जेव्हा प्रसादचा हा व्हिडीओ पाहिला जाईल तेव्हा मात्र तुम्ही हसून हसून दमालं यात काहीच शंका नाही. प्रसादने या व्हिडीओमध्ये केलेला अभियन एकदम कमाल आहे.
या व्हिडीओत प्रसाद डोळे बंद करुन झोपलेला दिसतो. तेवढ्यात त्याच्या कानावर पडणारा एक आवाज पडतो. ‘बेबी खुशनसीब को इंग्लीश में क्या कहते है?’ यावर प्रसाद चटकन उत्तर देतो कि, ‘अनमॅऱिड’ (अविवाहित) आणि त्यानंतर त्याच्या कानशीलात पडल्याचा आवाज येतो.’ या व्हिडिओतील प्रसादने दिलेले एक्स्प्रेशन्स चांगलेच भाव खाऊन जात आहेत. हा पूर्ण गंमतीचा भाग असून हि गंमत वाढविण्यासाठी त्याने कॅप्शनमध्ये ‘काही चुकलं का माझं?’ असा प्रश्न विचारला आहे. या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी अनेक कमेंट करीत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी प्रसादची आणखीचं टर उडवली आहे. तर कुणी त्याला समर्थन केले आहे. तर कुणी लिहिलंय, ‘खूपच चुकलं सर..’
Discussion about this post