हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपटाचे कथानक आणि चित्रपटातील पात्रे साकारणारे कलाकार, त्यांची वेशभूषा अशा विविध विषयांमुळे हा चित्रपट अडचणीत आल्याचे समोर आले होते. यावरून वेगवेगळ्या भागात वेगवेगळे वादही समोर आले होते. या चित्रपटाच्या लॉंच सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी चित्रपटात शिवरायांची भूमिका अक्षय कुमार साकारणार हे समोर आले होते. त्यानंतर आता अक्षयने या लूकमधील व्हिडीओ शेअर केला आहे.
मराठी ऐतिहासिक चित्रपटामध्ये बॉलीवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आल्यापासून विविध प्रतिक्रिया समोर आल्या. कुणी ट्रोल केलं तर कुणी समर्थन दिलं. इतकेच काय, तर अनेकांनी यांच्याऐवजी अन्य कोणत्याही मराठी कलाकाराला त्या भूमिकेसाठी घेता आले असते असेही म्हटले. त्यांनतर आता अक्षय कुमारने शिवरायांच्या वेशभूषेतील व्हिडीओ शेअर करत चित्रपटातील छत्रपतींची एक झलक दाखवली आहे. सोबत त्याने कॅप्शन देत ‘जय भवानी, जय शिवाजी’ असे लिहिले आहे.
याशिवाय एका पोस्टमध्ये तो शिवरायांच्या प्रतिमेसमोर उभा आहे जाणीव त्याचे प्रतिबिंब शिवरायांच्या फोटोवरील काचेत दिसत आहेत. या फोटोसह त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आज मराठी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’चे चित्रीकरण करतोय. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी माझे सौभाग्य समजतो. त्यांच्या आयुष्याची प्रेरणा घेऊन आणि आई जिजाऊ यांच्या आशीर्वादाने मी या भूमिकेसाठी माझे पूर्ण प्रयत्न करेन. आशीर्वाद असुद्या!’
Discussion about this post