हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीवरील बिग बॉसचा १६ वा सीजन जवळपास दहा आठवडे पार करून साथ दिवसांचा टप्पा ओलांडून गेला आहे. आता घरातील स्पर्धकांमध्ये ट्रॉफी जिंकण्याची एक वेगळीच ऊर्जा दिसून येते आहे. घरातील प्रत्येकाला ‘बिग बॉसच्या १६ व्या सिजनचा विजेता व्हायचं आहे. पण यासाठी आहि अन्य स्पर्धकांना बाजूला सारावे लागणार आहे. यासाठी बिग बॉसच्या घरात प्रत्येक आठवड्यात काही स्पर्धकांना घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केले जाते. तो दिवस आज आहे. कारण आज बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क होणार आहे.
सध्या बिग बॉसच्या घराचा राजा अंकित गुप्ता झाला आहे. यामुळे त्याच्या मर्जीतल्या २ स्पर्धकांना म्हणजेच प्रियंका चाहर चौधरी आणि साजिद खान यांना त्याने नॉमिनेशन पासून आधीच वाचवले आहे. आता घरात उरलेले इतर सदस्य जीव मुठीत धरून बसले असतील. कारण आज त्यांच्यापैकी काही सदस्य घरातून आणि बिग बॉसच्या खेळातून बाहेर होण्यासाठी एकमेकांकडून नॉमिनेट केले जाणार आहेत. नुकताच कलर्स टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रावर एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये नॉमिनेशन कार्याची छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. या घरात कुणीच कुणाचं नसतं.. हेच काय ते खरं.. आज सख्खा वाटणारा उद्या कधी दुश्मन होईल हे सांगणं फार कठीण. त्यामुळे कोण कुणाला नॉमिनेट करेल सांगता येणे मुश्किल आहे.
या टास्कमध्ये बिग बॉसने अंकितला घराचा राजा म्हणून अधिकार दिला कि, तो घरातील कोणत्याही ६ सदस्यांना इतर सदस्यांना नॉमिनेट करण्याचा अधिकार देऊ शकतो. यानुसार अंकितने प्रियंका, टीना, शालीन, सौंदर्या, अर्चना आणि सुंबूल यांची निवड केली. नॉमिनेशनच्या या टास्कचे नाव ‘नॉमिनेशन की डायन’ असे ठेवण्यात आले आहे. इथे घरातील सदस्यांनी एकमेकांची बाहुली डायनकडे सोपवत इतर सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे. रिपोर्टनुसार, यावेळी घरातून बाहेर होण्यासाठी बिग बॉसने दिलेल्या शिक्षेनुसार एमसी स्टॅन नॉमिनेट राहील.त्यासह नॉमिनेशन कार्याच्या प्रक्रियेदरम्यान शालीन, टीना, सुंबुल आणि निम्रित हे सदस्य नॉमिनेट होतील. आता नेमकं कोण कुणाला नॉमिनेट करणार हे तर आजच्या भागांतच कळेल.
Discussion about this post