हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून अभिनेत्री शिल्पा तुळसकरने साकारलेली अनामिका चाळिशीनंतरच्या प्रेमाचे स्वातंत्र्य व्यक्त करतेय. तिच्या या पात्राला बरेच प्रेम मिळत आहे. शिल्पाने केवळ मराठी नव्हे तर अनेक हिंदी मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे तिचा असा वेगळा चाहता वर्ग आहे. पण सध्या तिचा हा चाहता वर्ग तिच्यावर नाराज दिसतो आहे आणि याच कारण ठरतंय तिची नवी वेबसीरीज. तिच्या आगामी वेबसिरीज ‘हसरतें’चा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी शिल्पाच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे.
अभिनेत्री शिल्पा तुळसकर इतर अभिनेत्रींसारखी सोशल मीडियावर सक्रिय नसते. मात्र तिच्या प्रोजेक्तविषयी माहिती देण्यासाठी ती सोशल मीडियाचा वापर करताना दिसते. त्यामुळे तिच्या आगामी ‘हसरतें’ या वेब सीरिजचा ट्रेलर तिने शेअर केला आहे. या सीरिजचा ट्रेलर पाहिला तर पूर्ण सिरीज इंटिमेट सीन्सने भरलेली आहे हे स्पष्ट दिसत आहे. शिल्पाची हि सिरीज १२ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा ट्रेलर शेअर करताना तिने लिहिले आहे कि, ‘हसरतें तो हर दिल में होती है, पर ज़माने की बंदिशों के सामने उन्हें पूरा करना गलत सा लगता है। पर ये ख्वाहिशें यूं ही नहीं होती, कुछ तो कहानी होती है हर हसरत के पीछे। देखिए हसरतों की इसी संघर्ष पे आधारित 5 दिलचस्प कहानियां।’
या वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये शिल्पा तिच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या अभिनेत्यासोबत दिसते आहे. एकंदरच यामध्ये शिल्पाचे पात्र नेमके किती बोल्ड दाखवले आहे हे ट्रेलरवरून ठरवता येणार नाही. मात्र हि झलक पाहून तिचे चाहते भडकले आहेत. एका चाहत्याने यावर कमेंट करत म्हटलं आहे कि, ‘प्रेक्षकांनी थोड़ी पसंती काय दिली ह्या तर लगेच यांच्या लायकीत आल्या.. काय कमी केलिए मराठी सिनेसृष्टीने यांना जेने करुण त्यांना अश्या स्क्रिप्ट कराव्या लागताय.’ तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘तुम्हीपण आता असे रोल करणार..?’ तर काहींनी चक्क ‘शी….’ म्हणत वेब सिरीजला गलिच्छ म्हटलं आहे. याशिवाय अनेकांनी शिल्पाला ‘किमान तू तरी अशा भूमिका करू नकोस’ अशी विनंती केली आहे.
Discussion about this post