Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अरुंधतीचा लेक बापावर गेलाय; बायको गरोदर असताना अभि भलतीच्याच प्रेमात पडलाय..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 8, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Aai Kuthe Kay Karte
0
SHARES
3.2k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक नवा ट्विस्ट आणि सतत उत्सुकता वाढविणारे कथानक यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस नेहमीच उतरत असते. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम आहे. नुकताच या मालिकेत उत्कंठावर्धक वळण आले आहे. एकीकडे अरुंधती आणि आशुतोष यांच्या नात्यात येत असलेला गोडवा प्रेक्षकांच्या पचनी पडतोय तर दुसरीकडे अरुंधतीचा लाडका लेक अभीचं पाऊल चुकीच्या वाटेवर पडत आहे.

View this post on Instagram

A post shared by सीरियल जत्रा (@serialjatra)

या मालिकेच्या पुढील भागाची झलक असणारा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अरुंधती आणि आशुतोष आपल्या भावना व्यक्त करत आहेत. दोघेही आपल्या प्रेमाची कबूली देणार आहेत. पण ते बोलण्याआधीच अरुंधतीला तिचा मुलगा अभिषेक जो विवाहित आहे आणि त्याची पत्नी गरोदर आहे तोच अभि दुसऱ्या मुलीसोबत तिचा हात हातात घेतलेला दिसतो. त्याला पाहिल्यानंतर अरुंधतीला मोठा धक्का लागतो. एकीकडे अभिची बायको अनघा गरोदर आहे आणि दुसरीकडे अभि कुण्या भलत्याच मुलीसोबत प्रेमाचे चाळे करतोय हे पाहून अरुंधतीच्या पायाखालची जमिन सरकते.

अभिषेकचं हे सत्य समोर आल्यानंतर अरुंधती काय करणार याबाबत एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. अरुंधतीच्या वाटेल आलेलं दुःख आता अनघाच्या वाट्याला येणार कि काय..? अशी भीती प्रेक्षकांनाही वाटू लागली आहे. या नव्या ट्विस्टमुळे मालिका पुर्ण वेगळ्याच बदलाकडे जाणार आहे. या सगळ्यात आशुतोष अरुंधतीच्या प्रेमाचं काय होणार..? हे समजल्यावर अनघाची काय अवस्था होणार..? अनिरुद्ध या गोष्टीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहणार..? या सर्व प्रश्नांची उत्तरे आगामी भागांतच मिळतील.

Tags: Aai Kuthe Kay Kartemarathi serialPromo Videostar pravah
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group