हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आंणि चर्चेतील जोडपे म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख. खूप वर्षांच्या गॅपनंतर रितेश आणि जिनिलिया एकत्र एकाच चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. हा चित्रपट आहे ‘वेड’.
ज्याचे दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुखने केले असून हा चित्रपट मराठी आहे. ज्यामधून जिनिलिया मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करते आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत दोघेही अत्यंत उत्सुक आहेत. या चित्रपटाचे सध्या प्रमोशन सुरु असून यावेळी रितेशने चक्क ढोल वादन करीत पुण्यातील कॉलेज गाजवलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून रितेश आणि जिनिलिया यांचा ‘वेड’ हा चित्रपट चर्चेत आहे. येत्या ३० डिसेंबर २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतो आणि आणि यामुळे रितेश- जिनिलिया या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. सध्या हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय राहून चित्रपटाचे प्रमोशन करत आहेतच. शिवाय स्वतः ठिकठिकाणी उपस्थित राहूनही चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. मराठी मालिका रंग माझा वेगळा या मराठी मालिकेत प्रेक्षकांना प्रेमाचा धडा देत वेड चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी जिनिलियाने नुकतेच शूट केले आहे. त्यामुळे चित्रपटासह जिनिलिया मराठी मालिकेतही दिसणार आहे.
या दरम्यान ‘वेड’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख आणि चित्रपटाची टीम पुण्यातील एका कॉलेजमध्ये उपस्थित राहिली होती. या दरम्यानचा एक व्हिडीओ रितेशने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये तो स्वतः ढोलवादन करताना दिसत आहे. रितेशच्या या अंदाजाने आणि घुमणाऱ्या ढोलाच्या आवाजाने नाद निनादला होता. या व्हिडीओला रितेशने कॅप्शन दिले आहे कि, ‘हा वेडनेस होता. पुण्यातील कॉलेज विद्यार्थ्यांसह ढोल वादनाचा अनुभव फारच छान होता’. कॉलेजमधील विद्यार्थ्याबरोबरचा त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Discussion about this post