हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता सुपरस्टार चिरंजीवी लवकरच आजोबा होणार आहेत. हि गोड बातमी त्यांचा मुलगा आणि तेलुगु सुपरस्टार राम चरण याने आपल्या चाहत्यांना स्वतःहून दिली आहे. RRR चित्रपटातून सर्वश्रुत झालेला रामचरण स्वतः एक उत्तम अभिनेता म्हणून लाखो दिलों कि धडकन आहे. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवर त्याच्या चाहत्यांचे लक्ष असते. म्हणूनच त्याने स्वतःहून आपल्या चाहत्यांना आपल्या आनंदात सहभागी करत हि बातमी सोशल मीडियावर दिली आहे.
अभिनेता रामचरणची पत्नी उपासना गरोदर आहे आणि लवकरच ती एका चिमुकल्या जीवाला जन्म देणार आहे. रामचरणचे वडील आणि तेलुगु स्टार चिरंजीवी यांनी सोशल मीडियावर ‘बातमी शेअर करायला खूप उत्सुक आहे!!!’ असे कॅप्शन देत ही गुड न्यूज शेअर केली आहे. तर रामचरणने काही क्युट इमोजी शेअर करत हि आनंदाची बातमी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये श्री हनुमान देवतेचा फोटो शेअर करण्यात आला आहे. यासोबत पोस्टरमध्ये लिहिले आहे कि, ‘श्री हनुमान यांच्या कृपेने आम्हाला ही घोषणा करताना आनंद होत आहे की उपासना आणि रामचरण लवकरच आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. प्रेम आणि आभार..’
रामचरण कोनीडेला आणि उपासना कामिनेनी यांनी २०१२ मध्ये एकमेकांसोबत लग्न केलं. लग्नानंतर तब्बल १० वर्षांनी ते आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. काही महिन्यापू्र्वी उपासना प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत होती. मात्र तिनं सांगितलं होतं की, तिला सध्या बाळाला जन्म द्यायचा नाही आणि लोकांनी तिच्या या निर्णयाचा सम्मान करावा’. या निर्णयामागे तिने ग्लोबल वॉर्मिंगची चिंता आपल्याला भेडसावतेय असं सांगितलं होतं. तर रामचरणने एका मुलाखतीत त्याचा कुटुंब वाढविण्याचा विचार नाही, असे म्हटले होते. पण आता समोर आलेल्या बातमीवरून हेच समजतंय कि दोघांनी आपला निर्णय बदलत कुटुंब वाढविण्याचा विचार केला आहे. ज्यामुळे केवळ कोनीडेला कुटुंब नव्हे तर चाहतेही आनंदी आहेत.
Discussion about this post