हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिहेरी माध्यमातून अभिनेते डॉ. विलास उजवणे यांनी नेहमीच विविध पात्रांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. चार दिवस सासूचे, वादळवाट यांसारख्या प्रसिद्ध मालिकामधील त्यांच्या दमदार भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मराठी मनोरंजन विश्वात मोठं नाव असणाऱ्या या अभिनेत्याला एका गंभीर आजाराने ग्रासले आहे. या आजारावर उपचार करणे अत्यंत गरजेचे असताना त्यांची आर्थिक परिस्थितीदेखील बिकट झाली आहे. याबाबत त्यांच्या एका मित्राने सोशल मिडियावर माहिती देत आर्थिक मदतीसाठी आवाहन केले आहे.
गेले काही वर्षे विलास यांनी कोणत्याच माध्यमात काम केले नाही. याचे कारण आता समोर आले आहे. काही काळापूर्वी विलास उजवणे यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याचे समोर आले. मध्यंतरी त्यांची प्रकृती सुधारली होती. त्यातच विलास यांच्यावर हृदयरोगाची शस्त्रक्रिया करावी लागली. त्यातून बरे होण्याआधीच त्यांना दुर्मिळ कावीळ झाली. या आजारपणात त्यांची असलेली जमापुंजी देखील पणाला लागली. ज्यामुळे आताची परिस्थिती आणखीच गंभीर आणि कठीण होऊन बसली आहे. म्हणूनच त्यांचे मित्र राजू कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विलास यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे कि, ‘गेल्या काही काळापासून अभिनेते डॉ. विलास उजवणे यांची प्रकृती ठीक नाहीये. ते गेल्या सहा वर्षापासून ब्रेन स्ट्रोकशी झुंज देत आहेत. या आजाराशी दोन हात करता करता त्यांची संपूर्ण जमा पूंजी खर्च झाली आहे. आता त्यांना हृदयाचा त्रास सुरु झाला आहे. या दुर्मिळ आजारात त्यांना कावीळ झाली असून ते रुग्णालयात आहेत. त्यामुळे त्यांचं तात्काळ मोठं ऑपरेशन करणं गरजेचं आहे. आता त्यांना पुढच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज आहे.’ यासोबत विलास उजवणे यांचे अकाऊंट डिटेल्सदेखील जोडण्यात आले आहेत.
आपल्याला मदत करायची असल्यास..
Dr Villas Ujawane.. Saraswat Co-operative Bank. A/C No. 130200100009758. IFSC SRCB0000130
Dr Villas Ujawane.. Saraswat Co-operative Bank. A/C No. 005200100030302. IFSC SRCB0000005
हे त्यांचे अकाऊंट डिटेल्स आहे.
Discussion about this post