हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसचा १६ वा सीजन सगळ्यात जास्त कोण गाजवत..? असा सामान्य प्रश्न विचारला तर अनेकांचं उत्तर अगदी सहज ‘अर्चना गौतम’ असं येईल. कारण या घरात बाकी कुणाचा आवाज येउदे नाहीतर नको येउदे. पण अर्चनाचा आवाज नेहमी येतो. पण या आवाजाच्या शर्यतीत स्पर्धक प्रियांका चहर चौधरी तरी कुठे कमी आहे. मुद्दा कुणाचाही असला तरी माझाच आवाज मोठा असा झेंडा घेऊन नेहमीच प्रियांका फिरताना दिसते. या घरात आम्ही दोघी मैत्रिणी लाडाच्या म्हणत प्रियंका आणि अर्चना अनेकदा अनेकांची खिल्ली उडवत असतात. याच मैत्री आता एकमेकींसोबत भिडताना दिसल्या आहेत.
बिग बॉसचं घरचं असं आहे कि, इथे कोणत्याही कारणावरून कोणतीही नाती जुळतात आणि तुटतात. रोज इथे भांडण होतच असतात. या भांडणात अनेकदा मुद्दे बाजूला राहतात आणि स्पर्धक एकमेकांशी वैयक्तिक कारणावरून भांडू लागतात. कलर्स टीव्हीच्या अधिकृत पेजवर एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अर्चना गौतम आणि प्रियंका चहर चौधरी या मैत्रिणीच आपसात भिडताना दिसत आहेत. नेमकं हे भांडण कशावरून सुरु झालं यापेक्षा भांडण कोणत्या टोकाला जाईल याची मजा घरातले बाकी स्पर्धक घेताना दिसत आहेत.
या प्रोमो व्हिडिओत आपण पाहू शकता कि अर्चना म्हणते, ‘तुझ्यासारख्या मुलीला तर मी ठीक करेन’. यावर प्रियांका म्हणते, ‘करना माझ्यासारख्या मुलीला ठीक’. प्रियांका अर्चनाच्या अगदी जवळ जाते. तर अर्चना तिला ‘चल फुटेज खाऊ नको चल चल..’ असे म्हणताना दिसते. तिला सौंदर्या असं बोलू नको म्हणेल तर यावर अर्चना पुन्हा बोलेल कि, ‘बोलणार मी.. कोण थांबवणार मला.’ यावर प्रियांका म्हणते ‘मी थांबवणार’. तर अर्चना तिला ‘टॉल्क टू माय लेग’ म्हणत तिच्याकडे पाय दाखवते. यावेळी दुसरीकडे अब्दू म्हणतो, ‘वाह.. आता हा भाग बघायला मजा येईल.’ तर तिसरीकडे निम्रीत, सुंबुल आणि एमसी स्टॅन हि भांडण बघून मजा घेत हसत असतात. चिडवत असतात. कदाचित प्रेक्षकांनासुद्धा हे भांडण बघून हसू फुटू शकते. कारण यांची भांडण आज कचाकचा झाली तरी उद्या या मिठ्याच मारणार आहेत हे सगळ्यांनाच कळलं आहे.
Discussion about this post