हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिजनमध्ये ड्रामाक्वीन राखी सावंत वाईल्ड कार्ड म्हणून एंटर झाल्योपासून एकही दिवस बिग बॉसचं घर शांत आहे असं झालं नाही. आल्या दिवसापासून राखीचा घरात दंगा चालूच आहे. कधी भांडते, कधी रागावते, कधी मारायला धावते, तर कधी भयानक मेकअप करून सगळ्यांना घाबरवते. एंटरटेनमेंटबद्दल बोलायचं झालं तर हे सगळं एका लेव्हलपर्यंत मजेशीर वाटत होत. पण आता राखीने काही वेगळाच मार्ग निवडला आहे. घरातील वस्तूंची तोडफोड, स्पर्धकांसह मारामारी आणि वाट्टेल त्या टोकाला जाऊन बोलणे असा काहीसा तिचा अंदाज पाहायला मिळत आहे.
राखी मनोरंजन करता करता आता वैताग देऊ लागली आहे असे स्पष्ट दिसत आहे. घरातील सदस्य, प्रेक्षक आणि खुद्द बिग बॉसदेखील तिला सहन करू शकतील असं काही वाटत नाही. नुकतेच कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर काही प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. नुकतेच घरातील ड्युटीवरून तीच आणि घरातल्यांचं बिनसलं. यातच आता ती तिची ड्युटी तिच्या मनाप्रमाणे करते म्हणून घरातील सदस्य तिला वैतागले आहेत. अशातच राखीची कॉफी गायब झाल्याचे तिला समजते आणि मग काय नुसता राडा, धिंगाणा..
प्रोमो व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता कि, राखी सगळ्या सदस्यांवर चिडली आहे आणि ती घरातील भांडी जेवणाच्या प्लेट्स तोडू लागली आहे. माझी कॉफी कुठे आहे..? कुणी घेतली..? आताही सांगतेय मी मला माझी कॉफी द्या.. यावर अक्षय केळकर तिला ‘एक काम कर त्या सगळ्या वस्तू फेकून दे’ असे सांगतो. मग राखी आहेत नाहीत ती सगळीच भांडी उचलून टाकून देते. ज्यामुळे सगळ्या वस्तूंचे नुकसान होते. हे पाहून अपूर्वा चिडते आणि तिच्या अंगावर धावून जाते. तर घरातील अन्य सदस्य त्यांच्या मध्ये पडून हाणामारी होऊ देत नाहीत. पुढे अक्षय केळकर राखीला ‘मी सांगितलं म्हणून केलास तू हे..?’ असे विचारतो. मग राखी काय विचार करते माहित नाही पण ती थेट त्याच्या अंगावर धावून जाते. आता हि नक्की राखीचं आहे का तिच्या कल्पनेतलं भूत खरंच तिच्या अंगात आलंय हे तर आजच्या भागातच कळेल.
Discussion about this post