हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा चौथा सीजन आता जवळपास सत्तर दिवस ओलांडून पुढे गेला आहे. आता हा खेळ अटीतटीचा झाला आहे. एकतर जिंकायचं नाहीतर घराबाहेर व्हायचं. त्यामुळे प्रत्येक स्पर्धक फक्त आणि फक्त खेळात जिंकण्याच्या दृष्टिकोनातून उतरत आहे. या आठवड्यात कॅप्टन्सीचे उमेदवार म्हणून अमृता धोंगडे, किरण माने, आरोह वेलणकर आणि अक्षय केळकर यांची निवड झाली. पण बिग बॉसने असा काही गेम पलटला कि कॅप्टन्सी मिळवणे आता सगळ्यांसाठीच अवघड झाले आहे.
बिग बॉसने घोषणा करीत या चारही कॅप्टन्सीच्या उमेदवार सदस्यांना आपले समर्थक निवडायला सांगितले. ज्यामुळे अमृता धोंगडेसाठी विकास सावंत, किरण मानेसाठी प्रसाद जवादे, आरोह वेलणकरसाठी अमृता देशमुख आणि अक्षय केळकरसाठी अपूर्वा नेमळेकर हे सदस्य समर्थक म्हणून खेळणार असे उमेदवारांनी घोषित केले. यानंतर बिग बॉसने उमेदवार आणि समर्थकांमध्ये गेम पलटून अशी काही घोषणा केली कि सगळ्यांच्या पायाखालची जमिनचं सरकली. यामध्ये बिगबॉसने समर्थनासाठी स्पर्धकांनी निवडलेले सदस्य त्यांच्याविरुद्ध जिंकून कॅप्टन्सी मिळवू शकतात अशी घोषणा केली.
आज बिग बॉस मराठीच्या घरात आपल्याला या ८ सदस्यांमध्ये रंगणार कॅप्टन्सीचा टास्क पहायला मिळणार आहे. यामध्ये कॅप्टन्सीसाठी निवडल्या गेलेल्या स्पर्धकांनी समोर असलेल्या कोळीष्टकावर सर्वात जास्त कोळी चिकटवून कॅप्टन्सी आपल्या नावे करायची आहे. यामध्ये आता कोण जिंकणार..? आणि कोण हरणार..? हे तर चिकटवलेल्या कोळींची संख्याच सांगणार. पण प्रोमोवर तर या टास्कमध्ये स्पर्धक एकमेकांविरोधात खेळताना जाम राडे घालताना दिसणार आहेत. त्यामळे आज कोण कॅप्टन होणार हे पाहणे औत्सुक्याचे राहील.
Discussion about this post