हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि संकटे यांचं बहुतेक घट्ट नातं झालंय. गेल्यावर्षीपासून संकटांचं शाहरुखवर असं काही प्रेम जडलंय कि काय बोलायचं काम नाही. आर्यनची ड्रग केस संपली, मग मन्नतची डायमंड नेमप्लेट आली, ते झालं तोवर उमराह आणि वैष्णो दर्शन झालं. यानंतर आता ‘पठाण’ चित्रपटावर मोठं संकट आलंय. या चित्रपटातील ‘बेशरम गाणे’ रिलीज झाले आणि सोशल मीडियावर नुसता हाहाकार झाला. या गाण्यात शाहरुख आणि दीपिकाचे अनेक बोल्ड प्रसंग आहेत. याशिवाय दीपिकाने परिधान केलेली भगवी बिकिनी हा मात्र मोठा मुद्दा झाला आहे. आता हा मुद्दा केवळ विषय राहिला नसून वादग्रस्त मुद्दा झाला आहे.
या गाण्याला मध्य प्रदेशातील हिंदू संघटनांशिवाय विविध भागातील हिंदूंनी कडाडून विरोध केलाय. यानंतर आता देशभरात सिनेमावर मोठा वाद पेटला आहे. या वादात प्रकाश राज आणि पायल रोहतगीने उडी घेतल्यानंतर शर्लिन चोप्रानेही बुद्धी पाजळली. यांनतर आता मुस्लिम संघटनाही ‘पठाण’ चित्रपटाविरोधात उभ्या राहिल्या आहेत. राज्यातील उलेमा बोर्डाने चित्रपटाला विरोध केला असून तो राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही असे सांगितले आहे. शिवाय ऑल इंडिया मुस्लिम फेस्टिव्हल कमिटीनेदेखील ‘पठाण’ला विरोध केलाय. हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होऊ देणार नाही. मुस्लिम धर्माची बदनामी करण्याची परवानगी कोणालाही नाही, मग तो शाहरुख असो किंवा अन्य कोणताही खान, असे त्यांचे म्हणणे आहे.
पठान पर बरसे अयोध्या हनुमानगढ़ी के महंत राजूदास.. बोले दीपिका पादुकोण भगवा वस्त्र को बिकनी की तरह पहने हैं.. शाहरुख खान हमेशा सनातन संस्कृति का अपमान करते आए हैं.. ऐसी फिल्म का बहिष्कार करो और थिएटर को फूंक दो.. #Pathan @iamsrk @deepikapadukone @bollywood_life @Bollyhungama pic.twitter.com/gIuOeSyIN0
— Vivek K. Tripathi (@meevkt) December 15, 2022
दरम्यान अयोध्येचे हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे जनतेला आवाहन केले आहे. एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी यात म्हटले आहे कि, ‘मी लोकांना आवाहन करतो की, ज्या चित्रपटगृहांमध्ये पठाण दाखवला जाईल, अशा चित्रपटगृहांना आग लावावी’. लाईव्ह हिंदुस्तानने याबाबत वृत्त दिले आहे.
तसेच उलेमा बोर्डाचे अध्यक्ष सय्यद अनस अली यांनी एएनआयशी बोलताना म्हटले आहे कि, ‘या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आम्ही हा चित्रपट केवळ मध्य प्रदेशातच नाही तर संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही. पठाण हे मुस्लिम समाजातील एक प्रतिष्ठित समुदाय आहेत. या चित्रपटातून केवळ पठाणांचीच नव्हे तर संपूर्ण मुस्लिम समाजाची बदनामी केली जात आहे. ‘पठाण’ असे या चित्रपटाचे नाव असून यामध्ये महिला अश्लील डान्स करताना दिसत आहेत. चित्रपटात पठाणांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे.’ एकंदरच या प्रतिक्रिया पाहता शाहरुखचा ‘पठाण’ मोठ्या संकटात सापडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
Discussion about this post