हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजवर अनेक चित्रपट आणि मालिका प्रसारित झाल्या. त्यांचे कथानक प्रेक्षकांचे भावले. पण आताच्या शर्यतीत प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळे फंडे आजमवायला लागतातच. एकीकडे मराठी चित्रपटांची होणारी गळचेपी आणि दुसरीकडे प्रेक्षकांची आवड यामध्ये TRP आणि प्रोमोशनसाठी वेगवेगळे प्रयोग करावे लागतात.
काही महिन्यांपूर्वी प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचे भव्य पोस्टर आणि प्रमोशनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यश मिळवल्याचे आपण पाहिले. या प्रमोशनच्या युक्तीचा वापर आता मराठी मालिकेसाठीदेखील केला गेला आहे. लोकमान्य या आगामी मालिकेच्या वाळू शिल्पानंतर आता १०० फूट पोस्टरने सर्वांना थक्क केले आहे.
आतापर्यंत झी मराठी वाहिनीने अनेक ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या. यात आता लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे चरित्र घेऊन येणारी ‘लोकमान्य’ हि मालिका देखील समाविष्ट होत आहे. ही नवी मालिका २१ डिसेंबर २०२२ पासून सुरु होत आहे. या मालिकेत अभिनेता क्षितीश दाते लोकमान्य टिळक यांची भूमिका साकारताना दिसत आहे. तर स्पृहा जोशी त्यांच्या भार्येच्या भूमिकेत दिसणार आहे.
सध्या या मालिकेचे भव्य चित्रपटाप्रमाणे एकदम जोरोशोरेसे प्रमोशन करण्यात येत आहे. मालिकेच्या प्रमोशनसाठी ‘लोकमान्य’ मालिकेचा 100 फूटी बॅनर झळकवण्यात आला आहे. भिवंडीतील एका नावाजलेल्या फ्लाईंग रेस्टॉरंटमध्ये मालिकेच्या या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. अतिशय भव्य आणि लक्षवेधी असे हे पोस्टर पाहताक्षणी मनात उतरत आहे.
या पोस्टरचे अनावर करतेवेळी मालिकेत मुख्य भूमिकेत असणारे स्पृहा जोशी आणि क्षितिश दाते हे दोन्हीही कलाकार उपस्थित होते. अलीकडेच या ऐतिहासिक मालिकेच्या निमित्ताने दोन दिवसांपूर्वी मुंबईतील लोकमान्य टिळक समाधी स्थळ, गिरगाव येथील चौपाटीवर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पगडी आणि नावाचे मिळून एक सुंदर वाळूशिल्प साकारले होते. या वाळू शिल्पानेदेखील येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधले होते. यानंतर आता हे पोस्टर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रमोशनच्या दुनियेत एव्हढ्या तगड्या कल्पांसह मालिका उतरत आहेत याहून आणखी आनंद तो काय.
Discussion about this post