हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी सीजन ४ या शोचे आता फक्त काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे काही आठवड्यांपूर्वी गजबलेलं हे घर आता हळू हळू शांत होऊ लागलं आहे. घरातून एक एक स्पर्धक बाहेर पडतोय म्हणजेच खेळातून बाद होत आहे. नुकतेच बिग बॉस मराठीच्या घरातून डबल एव्हिक्शनमध्ये २ सदस्य घराबाहेर पडले आहेत. शनिवारी स्पर्धक विकास सावंत याने बिग बॉसचा निरोप घेतला आणि त्यानंतर रविवारी स्पर्धक अमृता देशमुख अर्थात पुण्याची टॉकरवडीचा या घरातील प्रवास संपला.
खरंतर बिग बॉस मराठीच्या या विकेंडमध्ये डबल एव्हिक्शन होईल अशी कुणालाच कल्पना नव्हती. कारण बिग बॉसने याबाबत वाच्यता केली नव्हती. पण चावडीवर अचानक महेश मांजरेकर म्हणाले कि, ‘आज दोन सदस्य घराबाहेर होणार आहेत’. हे ऐकताच सगळ्यांचे डोळे खूलेचं राहिले. गेली ७५ दिवस झाले बिग बॉस मराठीचा खेळ वाद, भांडण, बाचाबाची, हाणामारी सगळ्या पद्धतीने खेळला गेला. पण एव्हिक्शन हा क्षण असा असतो जिथे कुण्या एकाचा प्रवास थांबतो आणि घरातील प्रत्येकाचे डोळे वाहतात. यावेळी विकासाच्या एव्हिक्शनने अपूर्वा आणि किरण माने या दोघांनाही अश्रु अनावर झाले. बाहेरच्या जगात विकास सावंतची डान्सर म्हणून एक ओळख होतीच पण आता बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर सगळे त्याला आपला विकास म्हणून ओळखतील.
यानंतर रविवारी प्रसाद, अपूर्वा आणि अमृता देशमुख डेंजर झोनमध्ये आले होते. आता प्रसाद जाणार असेच सगळ्यांना वाटत होते आणि असताना तो सेफ झाला. यानंतर अमृता देशमुख घराबाहेर पडणार हे जाहीर करण्यात आले ती ढसाढसा रडू लागली. जाताना अमृता कुणाशीही काहीही न बोलता थेट घराबाहेर पडली. खरतर अमृताचे एव्हिक्शन फारच धक्कादायक होते. पण शेवटी खेळच तो. बाहेरच्या जगात अमृता ही एक अभिनेत्री असून पुण्यामध्ये रेडियो जॉकी म्हणून तो कार्यरत आहे. तिला पुण्याची टॉकरवडी म्हणून ओळखतात.
Discussion about this post