हॅलो बॉलिवुड ऑनलाईन। कलर्स टीव्हीच्या बिग बॉस १६ चे यंदाचे पर्व १३ आठवडे पूर्ण करण्याच्या टप्प्यात आहे. अशातच शोला मिळणार प्रतिसाद पाहून बिग बॉसने यंदाचा सीजन ४ आठवड्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घरातल्या स्पर्धकांना सांगून एक दावत देऊन या गोष्टीचा आनंद साजरा केला गेला. दरम्यान घरातील सदस्यांना उत्साह पाहण्यासारखा होता. जवळपास ११ आठवडे होऊन गेले. हे स्पर्धक या शोसाठी जीव लावून खेळत आहेत. पण यांमध्ये काही असेही स्पर्धक आहेत जे शो कधीही संपेल अशा टप्प्यावर असताना जागे झाले आहेत. जसे कि अंकित गुप्ता आणि सुंबुल तौकीर खान.
या घरातील हे दोन सदस्य बोरिंग आणि या घरात काहीही न करण्यासाठी ओळखले जातात. भले यांची बाहेर मोठी फॅनफॉलोइंग आहे. पण घरात यांचा झिरो परफॉर्मन्स पहायला मिळाला आहे. असे असताना २ आठवड्यांपूर्वी अंकितने कॅप्टन्सी मिळवून घराची सत्ता चालवली. तर गेल्या आठवड्यात सौंदर्या शर्मा आणि टीना दत्तासोबत सुंबुलने कॅप्टन्सी मिळवली. यानंतर घरात आठवडाभर तिचा आवाज चुकून कधीतरी असा ऐकू आला. पण आगामी भागात सुंबुल नुसती ऐकू येणार नाही तर दिसणारसुद्धा आहे. तेही घरातील इतर सदस्यांना जागवताना दिसणार आहे
कलर्स टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्राम नुकताच रिलीज झालेल्या प्रोमो व्हिडिओमध्ये सुंबुलचा एक वेगळाच अवतार सगळ्यांना पहायला मिळाला आहे. कालच्या भागात सुंबुल आणि टीनामध्ये कॅप्टन्सच्या चॉकलेट्सवरून भांडण झाल्याचे आपण पाहिले. ज्यामध्ये टिनाने सुंबुलला अदृश्य म्हटले. यानंतर आज सुंबुल याच भांडणाचा बदला घेताना दिसणार आहे. ते हि फुल ड्रामा करून. कॅप्टन असूनही जेव्हा टीना झोपलेली दिसली तेव्हा सुंबुलने थेट चमच्याने ताट बडवायला सुरुवात केली. इतकेच नव्हे तर मी कुणालाही झोपून देणार नाही अशी शपथही घेतली. आता यामुळे फक्त टीना वैतागणार का अख्ख घर..? हे तर आजचं समजेल. पण सुंबुलचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना आवडला आहे.
Discussion about this post