हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात अभिनेत्री रुचिरा जाधव हि स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड डॉ. रोहित शिंदेदेखील या शोमध्ये सहभागी झाला होता. पण दोघांचाही प्रवास लवकर संपला. दरम्यान या घरात त्यांच्यामध्ये प्रचंड भांडण झाली आणि शेवटी हे नाते तुटण्याच्या सीमेवर येऊन ठेपले. या सर्व प्रकारामुळे रुचिरा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत राहिली आहे. यानंतर मनाच्या शांतीसाठी रुचिरा मुंबईतील जुहू येथे असणाऱ्या इस्कॉन मंदिरात गेली होती. यावेळी तिने मंदिर समितीने आयोजित केलेल्या ‘तुला दान महोत्सव’मध्ये सहभाग घेतला होता. यावेळी तिने तिच्या वजनाइतक्या गीता दान केल्या आहेत.
रुचिराने हि पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘गीता जयंती (जी 3 डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी येथे होते)च्या शुभ प्रसंगी, इस्कॉन- जुहू मंदिरने संपूर्ण महिनाभर “तुला दान महोत्सव” आयोजित केला होता, जिथे भक्तांना गीता दान करण्याची संधी मिळते. श्रीमद भगवदगीता- जिथे जीवनाचे सार असते. माझ्या कृष्णाने सांगितलेलं जीवन सार…
या महोत्सवामागे एकच उद्देश आहे की, ‘एखाद्याच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि जीवनाचा उद्देश जाणून घेण्यासाठी सक्षमीकरण’, गीता वाचल्यावर ज्ञानप्राप्ती सुरू होते! मी हे केले आणि मी भाग्यवान आहे ! ते अन्नदान हे श्रेष्ठ दान म्हणतात. होय.. आहे. ते शरीराला पोसतं आणि रुचिरा म्हणते ज्ञानदान म्हणजे परमदान. जसे ते मन आणि आत्मा यांना पोसते.
रुचिरा कृष्ण भक्त आहे हे काही वेगळे सांगायला नको. कृष्णाचं वेड कुणाला लागत नाही..? तो आहेच इतका मनमोहक. पण या तुला दान प्रकारामूळे नेटकरी मात्र प्रचंड भडकले आहेत. अनेकांचे म्हणणे आहे कि, ‘श्रीमद भगवत गीता’सोबत कुणाचीच तुला होऊ शकत नाही. एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘तुम्ही गीतेला रद्दी मानत आहात हे पूर्णपणे चुकीचे आहे… या हरे कृष्ण भक्तांनी तुम्हाला हे कसे करू दिले तेच कळत नाही.’
तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘माझा राधे कृष्णावर विश्वास आहे.. हा अनेक ग्रंथांपैकी एक पवित्र ग्रंथ आहे हे समजण्यासाठी पुरेसे आहे. ते सिद्ध करण्याची कुणालाही गरज नाही’. तर अन्य अनेकांनी आपणही हि तुला केल्याचे म्हटले आहे. शिवाय अनेकांनी रुचिराच्या या कृतीचे समर्थन केले आहे आणि याला पुण्य म्हटले आहे.
Discussion about this post