Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मधुराणी.. तू नेहमीच मन लावून गातेस’; अरुंधतीच्या अंगाईचे सलील कुळकर्णींनी केले कौतुक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 23, 2022
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
57
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील ट्रेंडिंग नंबर वन मालिका ‘आई कुठे काय करते’ गेल्या काही दिवसांपासून फार पटापट रंजक वळणं घेत आहे. मालिकेतील चालू ट्विस्ट नात्यांमधले प्रेम, विश्वास, हळवेपणा अशा विविध भावनांचे उघड प्रदर्शन करत आहेत. यामुळे हि मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसत आहे. सध्या मालिकेत अरुंधतीसारखेच तिची सून अनघाच्या आयुष्यातही नात्यांचे वादळ घोंगावत आले आहे. मात्र आता अरुंधती अनघाच्या मागे खंबीरपणे उभी आहे. एक सासू नाही तर आई म्हणून ती अनघा आणि तिच्या बाळाची काळजी घेतेय. यावेळी मालिकेच्या गरजेनुसार एक प्रसंग चित्रित करताना अरुंधतीने एक अंगाई गायली आहे. जी ऐकून प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी यांनी अभिनेत्री मधुराणीचे कौतुक केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Saleel Kulkarni (@saleelkulkarniofficial)

अलीकडेच मालिकेच्या प्रसारित झालेल्या एका भागात अरुंधती अनघा आणि बाळाला झोपविताना अंगाई गाताना दिसली आहे. ही अंगाई ऐकून चाहते तर भारावलेच शिवाय संगीतकार सलील कुलकर्णीदेखील मंत्रमुग्ध झाले आहेत. त्यामुळे प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करीत अभिनेत्री मधुराणी गोखलेचे कौतुक केले आहे. मुळात अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर केवळ अभिनेत्री नव्हे तर उत्तम गायिकादेखील आहेत. शिवाय मालिकेत गायलेली अंगाई हि सलील यांच्या ‘एकदा काय झालं’ चित्रपटातील आहे. त्यामुळे सलील यांनी आवर्जून हि पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये सलील यांनी ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती अंगाई गातानाचा व्हिडीओ तयार करून शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी लिहिले आहे कि, ‘बाळाला झोप का ग येत नाही… ‘एकदा काय झालं’मधली माझी अतिशय आवडती अंगाई…!! आज ‘आई कुठे काय करते’मध्ये मधुराणी म्हणजेच मालिकेतल्या अरुंधतीला ती एका हळव्या प्रसंगी गाताना पाहून अनेक फोन आले.. मेसेज आले… या क्षणाच्या सर्वात लोकप्रिय मालिकेत ‘एकदा काय झालं’ मधलं हे गाणं घेणं ही पण गाण्याला आणि चित्रपटाला मिळालेली एक दादच आहे… यासाठी सगळ्यांचे मनःपूर्वक आभार… मधुराणी.. तू नेहमीच मन लावून गातेस!’ सलील यांच्या पोस्टवर मधुराणी यांनी कमेंट करीत लिहिले आहे कि, ‘धन्यवाद..! तू केलेलं गाणं गाण्याचा प्रयत्न करणं हे माझ्यासाठी अतिशय आनंददायी असतं. तू माझा अतिशय आवडता संगीतकार आहेस.’

Tags: Aai Kuthe Kay KarteInstagram PostMadhurani Gokhale-PrabhulkarSaleel Kulkarnistar pravah
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group