हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट केदार शिंदे यांच्यासाठी अत्यंत खास आणि जवळचा आहे. शाहीर कोण होते..? कसे होते..? आणि त्यांनी लोककला कशी जगली आणि जपली..? हे उभा महाराष्ट्राला माहित व्हावे म्हणून या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासून ते चित्रपटातील पात्रांची ओळख इथपर्यंत केदार शिंदे यांनी पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. नुकतीच त्यांनी चित्रपटातील साने गुरुजी यांच्या पात्राची ओळख करून दिली आहे. पण साने गुरुजी आणि शाहीर यांचं काय नातं होतं..? असा सवाल सर्वांनाच पडला आहे. तर साने गुरुजी हे शाहिरांचे दिशादर्शक आणि गुरु होते. त्यांनी शाहिरांनी अशी वाट दाखवली जी अन्य कुणी पाहूहू शकत नव्हतं. त्यामुळे शाहीर घडविण्यात साने गुरुजींचा मोठा वाटा आहे.
चित्रपटातील गुरुजींच्या भूमिकेवरील पडदा उघड करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस हा उत्तम दिन ठरला. या निमित्त केदार शिंदेंनी हि खास पोस्ट शेअर केली आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘जीवनाच्या प्रवासात योग्य गुरू लाभला तर तो आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे शाहीर साबळे आणि त्यांचे गुरू साने गुरुजी. वेळोवेळी शाहिरांच्या जीवनात येऊन त्यांना दिशा देणारे आणि त्यांच्या आयुष्यातल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींचे कारण असलेले साने गुरुजी यांचा आज जन्मदिवस. त्याच प्रित्यर्थ तुमच्या समोर सादक करतो आहोत ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमातील साने गुरुजी यांची पहिली झलक. साने गुरुजींच्या भूमिकेत अमित डोलावत. गुरू शिष्याचं नातं उलगडणार… २८ एप्रिल २०२३ रोजी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात’.
आतापर्यंत चित्रपटातील मुख्य भूमिका म्हणजेच शाहिरांची भूमिका अंकुश चौधरी, तर शाहिरांच्या पत्नी भानुमती यांची भूमिका केदार शिंदेंची लेक सना शिंदे साकारणार हे समोर आले होते. याशिवाय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची भूमिका अतुल काळे साकारणार असल्याचीही माहिती केदार यांनी पोस्ट लिहुनच दिली होती. यानंतर आता महाराष्ट्र घडवण्यासाठी ज्यांनी मोठी भूमिका निभावली त्या साने गुरुजींच्या भूमिकेवरून पडदा उघड केला आहे. या भूमिकेत आपल्या भेटीला अभिनेता अमित डोलावत येत आहे. तो याआधी काही मालिकांमध्ये दिसला होता.
तर स्टार प्रवाह वरील ‘लक्ष्य’ या कार्यक्रमातून तो प्रकाश झोतात आला. यानंतर त्याने ‘महाराष्ट्राचे शाहीर’ चित्रपटात साने गुरुंजींची भूमिका साकारण्याचे मोठे आव्हान घेतले आहे. हि भूमिका तो कसा साकारतो हे पाहण्यासाठी प्रेक्षक आता आतुर झाले आहेत.
Discussion about this post