हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासून सगळेच आपला गेम खेळत असताना बऱ्याच जणांची एकमेकांशी चांगली गट्टी जमल्याचे पहायला मिळाले. यात अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर हि जोडी नंबर एक आहे. टास्क असो, भांडण असो, राडा असो किंवा मुद्दा मांडणं.. सगळीकडे अक्षय आणि अपूर्वा एकमेकांच्या बाजूने खंबीर उभे राहताना दिसले. पण आता जेव्हा हा खेळ अंतिम टप्प्यात आला आहे तेव्हा हि दोघं एकमेकांपासून लांब पळताना दिसत आहेत. थोडे नाराजसुद्धा दिसत आहेत. हीच नाराजी व्यक्त करताना त्यांच्यात भांडण झाल्याचे दिसले आहे.
कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रावर एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये अपूर्वा आणि अक्षय यांच्यामध्ये शाब्दिक वार सुरु आहेत. इथे अक्षय म्हणतोय कि, ‘तू तुझ्या मर्जीप्रमाणे नाही ना अपूर्वा चालू शकत’. तर अपूर्वा म्हणते कि, ‘ काय झालं त्यात.. असा का टोन लागलाय..?’. तर अक्षय म्हणतो कि, ‘मी तुझ्याशी चार वेळा बोलायला आलो.. तू बोललीस का..?’. यावर अपुर्वा म्हणते कि, ‘हा तुझा विचार असेल तर नको बोलूस माझ्याशी.. मी का सतत तुझ्या मैत्रीची भीक मागावी’. यावर अक्षय ‘चल जा नको बोलूस’ म्हणतो आणि निघून जातो. यावर अपूर्वा ‘ओके’ म्हणते. जे ऐकून अक्षय म्हणतो, ‘नेमळेकर तू स्वार्थी आहेस’.
हा प्रोमो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर काही प्रेक्षकांनी आपापल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. ज्यामध्ये एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘अपूर्वाच्या आई आणि मामाने सांगितल्यामुळे हे सगळं होतंय’. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘दोघेपण व्हिलन आहेत’. तसेच आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘सीजन संपायला आला आता हे करून फायदा नाही.. लोकांना वेड्यात काढणं बंद करा.. भांडण करून दाखवायला उशीर झालाय.’ असेच आणखी एका प्रेक्षकाने म्हटले आहे कि, ‘झालं ना आता काम.. मग काय इंडिविज्युअल गेम.. असं होणारचं.. हे दोघेही पक्के स्वार्थी आहेत’.
Discussion about this post