हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील मनोरंजनाच्या शर्यतीत कलर्स मराठी वाहिनीने एक मानाचे स्थान पटकावले आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व चालू सीरिअल प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. अलीकडेच ‘शेतकरीच नवरा हवा..’ या सिरियलच्या माध्यमातून एक नवे कथानक या वाहिनीने प्रेक्षकांच्या भेटीस आणले. यानंतर आता ‘रमा- राघव’ आणि ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिका लवकरच सुरु होत आहेत. पण यांपैकी एक मालिका तर सुरु होण्याआधीच बंद करा अशी मागणी प्रेक्षकांकडून केली जात आहे. हि मालिका येत्या नव्या वर्षात ९ जानेवारीपासून रात्री १० वाजता कलर्स मराठी वाहिनीवरील प्रसारित केली जाणार आहे. पण प्रेक्षकांना संताप पाहता मालिकेवर निषेधाचे संकट ओढवले आहे.
त्याच झालं असं कि, ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये असे दाखविण्यात आले आहे कि, ‘एक श्रीमंत बाई बॅगभर पैसे घेऊन बँकेतून बाहेर पडते आणि आपल्या गाडीत ठेवते. ती गाडीत बसणार इतक्यात एक मुलगी म्हणजेच या मालिकेतील नायिका त्या बाईला काकी तुमचा फोन पडलाय सांगून तिचे लक्ष विचलित करते. त्या बाईला फसवून नायिका पैशांच्या बॅगची अदला बदली करून पैशांची चोरी करते आणि साथीदारासोबत गाडीवरून पळून जाते. हा चोरिचा पैसा ती गावातील मुलांच्या हितासाठी वापरणार असल्याचे सांगताना यात दिसते.’ मालिकेच्या ब्रीद वाक्यानुसार.. ‘आपण चोरी नाही करत,आपण लेव्हल करतो.. समाजात बॅलेन्स राहिला पाहिजे’ असे तू सांगते. हे पाहून प्रेक्षकांचा पारा चढला आहे.
प्रेक्षकांनी हा प्रोमो पाहताच मालिकेबाबत नकारात्मक मत मांडायला सुरुवात केली आहे. अनेकांनी ‘अशा मालिकांच्या कथानकामुळेच समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे आणि अजून वाढणार’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एकाने ‘चोरी करायला शिकवायचं असेल तर मग नको असली सीरिअल… चोरी कसली आहे किंवा कशासाठीही असली तरी चोरी ती चोरीच असते’ असे म्हटले आहे. याशिवाय ‘चोरीचे पैसे शिक्षणात वापरणे चुकीचे आहे.. बंद करा मालिका’ असेही काहींनी म्हटले आहे. तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘चुकीचा संदेश देताय समाजाला.. अशाने गुन्हेगारी वाढत असते, शिक्षण नाही’. याशिवाय काहींनी ‘कलर्स मराठी अशा गोष्टींचा प्रोत्साहन देऊन समाजात चुकीचा संदेश देत आहे’ असा आरोप देखील प्रेक्षकांनी केला आहे.
Discussion about this post