हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ह्याच त्याच.. तुमचं आमचं.. प्रेम अशी गोष्ट आहे जी कधी ना कधी कुठे ना कुठे तोंडावर पाडते आणि आयुष्याचे बांबू लावते. तुमचे लागलेयत का कधी ‘बांबू’..? लागले असतील तर मग हा चित्रपट तुमच्या आयुष्यातल्या त्या बांबू लागलेल्या अनुभवावरच आधारित आहे. प्रेमात थँक्यू.. सॉरी.. यापेक्षा अवघड प्रसंग असतो जेव्हा मुलगी म्हणते ‘मला तू आवडतोस.. पण.. मी तुला त्या नजरेनं कधी पाहिलं नाही’. झालं.. अडलं का घोडं. असंच बुलेट ट्रेन झालेल्या प्रेमाची धाडकन घसरलेली गोष्टी घेऊन तेजस्विनी पंडित निर्मित आणि अभिनय बेर्डे, वैष्णवी कल्याणकर अभिनित ‘बांबू’ चित्रपट येत आहे. याबाबत तेजस्विनीने एक पोस्ट शेअर करत कितीतरी चाहत्यांचं एका मिनिटांत हार्ट ब्रेक केलं आहे.
प्रेमात बांबू कसे लागतात, याची गोष्ट सांगणारा ‘बांबू’ हा चित्रपट येत्या २६ जानेवारी २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्मित तसेच विशाल देवरूखकर दिग्दर्शित ‘बांबू’ या चित्रपटाच्या शीर्षकापासून ते टीझरपर्यंत नुसती सोशल मीडियावर चर्चा आहे. अंबर विनोद हडप यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि वैयक्तिक आयुष्यातला चटका घेऊन हा चित्रपट आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. याआधी सोशल मीडियावर चित्रपटाचे प्रमोशन एकदम जोरात सुरु झाले आहे.
अभिनेत्री तेजस्विनी पंडीत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने निर्मिती क्षेत्रात जोरदार पदार्पण केले आहे आणि त्यामुळे ती आगामी प्रोजेक्ट्सची माहिती सोशल मीडियावर देते. ‘अथांग’नंतर आता ‘बांबू’ सिनेमाची निर्मिती तिने केली आहे. याबाबत तिने एक पोस्ट शेअर केलीये. ज्यामध्ये लिहिलंय ‘मला तू खूप आवडतोस पण…’ आणि यापुढे बॅकग्राउंडला ‘मी तुला त्या नजरेनं कधी पाहिलं नाही’ हे गाणं वाजत. पुढे अभिनय ‘काय’ असे म्हणताना दिसतोय.
हा भन्नाट व्हिडीओ शेअर केल्यापासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओसोबत तेजुने कॅप्शनमध्ये विचारलय कि, ‘तिचं फेवरेट वाक्य… तुमच्याबरोबर असं झालंय का ??? मला तू खूप आवडतोस पण……. आणि मग लागतात ‘बांबू’.. ‘बांबू’चा टिझर पाहिलात का..?” मला तू खूप आवडतोस पण….. हा डायलॉग बऱ्याच तरुणांच्या ओळखीचा आहे. आता तेजुनेही हा डायलॉग चिकटवलाय म्हणजे उरला सुरला चान्स गेला म्हणायचं. यामुळे न जाणे कित्येक तरुण चाहत्यांचं हार्टब्रेक झालं असेल. पण मजेची बाब सोडली तर हा चित्रपट तरुण वर्गाला आकर्षित करणार हे पक्के दिसत आहे.
Discussion about this post