हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १६’च्या घरातले सदस्य बघावं तेव्हा कोण कोणापेक्षा कमी कॅमेरात दिसतंय याचीच चर्चा करताना दिसत असतात. एकतर किचनमध्ये राशन वरून भांडतात, मला कमी दिलं. याने जास्त खाल्लं… इ. नाहीतर मग कोणी या शोसाठी किती योगदान दिलं आहे..? हा तर रोजचा गरम विषय आहे. यामध्ये सगळ्यात अव्वल आहेत ते टिना दत्ता आणि शालीन भनोत. हे दोन सदस्य असे आहेत ज्यांना आपण कॅमेरात जास्त दिसण्यासाठी इतर कोण कमी दिसतंय किंवा जास्त दिसतंय यात अधिक रस असतो. याच विषयावर चर्चा सुरु असताना शालीनने सुंबुलला टार्गेट केलं. पण यावेळी सुंबुल गप्प बसली नाही तर तिने पलटवार केला आहे.
सोशल मीडिया इंस्टाग्रामवर कलर्स टीव्हीच्या अधिकृत पेजवरून प्रोमो शेअर करण्यात आले आहेत. यातील एका प्रोमो व्हिडिओमध्ये शालीन आणि सुंबुल एकमेकांशी हुज्जत घालताना दिसत आहेत. शालीन वारंवार सुंबुलला तिचे योगदान कमी असल्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. शालिनने शिवसोबत बोलताना ‘या घरातील कोणत्याही इतर सदस्यांपेक्षा या शोमध्ये आणि घरामध्ये सुंबुलचा सहभाग कमी आहे..’ असे म्हटले. एकदा दोनदा नव्हे तर तर तो वारंवार हेच म्हणत राहिला. शेवटी सुंबुल मध्ये पडली आणि म्हणाली ‘तू कधीच बोलतोय..? त्या गोष्टीला बरेच दिवस होऊन गेले’. यावर शालीन तिला म्हणतो, ‘कधीच म्हणजे …?आताच ४ आठवड्याचं म्हणतोय.’ यावर सुंबुल म्हणते ४ आठवडे म्हणजे अख्खा महिना होतो.. तू अप्रत्यक्षपणे मला कमजोर म्हणतोयस.’.
यावर शालीन तिला म्हणतो, ‘तुझ्यात लढायची टाकत नाही.. म्हणून तर तुझे वडील तुला सारखे समजावत असतात.. तू सारखी रडत असतेस आणि तुझं योगदान कमी आहे तर आहे.. तुझा सहभाग आहे घरात कमी.. जाऊन कुणालापण विचार.. बिगबॉसला विचार…’. यावर सुंबुल त्याला म्हणते कि, ‘हे म्हणणारा तू कोण आहेस..? तू कोण ठरवणार कि मी कमजोर आहे.. राहूदे… तुझ्याने हे नाही होणार.. कारण मी कमजोर नाहीये’. तर शालीन म्हणतो, ‘माझी मर्जी.. माझ्या बापाची मर्जी.. मी बोलणार..चल आता रडू नको’. यावर सुंबुल म्हणते कि, ‘मी अजिबात रडत नाहीये… आणि कुणाला एव्हढं पण रडवू नये कि त्याच्या डोळ्यातलं पाणी सुकून जाईल’.
Discussion about this post