हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचे आज शुक्रवारी ३० डिसेंबर, २०२२ रोजी निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात सकाळी ३.३० वाजता हीराबेन मोदी यांची प्राणज्योत मालवली.
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है। pic.twitter.com/yE5xwRogJi
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये पोहोचले आणि आईच्या पार्थिवाला खांदा देत जड अंतःकरणाने अंतयात्रेत सहभाग घेतला. मातृछत्र हरपणे याहून अधिक कष्टदायी वेदना आणखी काहीच असू शकत नाही. आज जगभरातून अनेकांनी मोदींच्या मातोश्रींना श्रद्धांजली वाहणाऱ्या शोकाकुल पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. यामध्ये अनेक बॉलीवूड कलाकारांचादेखील समावेश आहे.
आदरणीय प्रधानमंत्री @narendramodi जी! आपकी माताश्री #हीराबा जी के निधन का सुनकर मन दुखी भी हुआ और व्याकुल भी।आपका उनके प्रति प्यार और आदर जग ज़ाहिर है।उनका स्थान आपके जीवन में कोई नहीं भर पाएगा! पर आप भारत माँ के सपूत हो! देश की हर माँ का आशिर्वाद आपके ऊपर है।मेरी माँ का भी!🙏🕉 pic.twitter.com/L9uPvMWjM2
— Anupam Kher (@AnupamPKher) December 30, 2022
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी मोदींच्या मातोश्रींचा फोटो शेअर करत ट्वीट केले आहे कि, ‘आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी! तुमची आई हीराबेन मोदी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःख झाले. तुमचे आईप्रती असलेलं नितांत प्रेम आणि आदर जगजाहिर आहे. आईचे तुमच्या आयुष्यात असलेले स्थान कोणीच घेऊ शकत नाही. पण आपण भारताचे सुपुत्र आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक आईचा आशीर्वाद तुमच्यावर आहे, माझ्या आईचाही!!’
माँ को खोने से बड़ा दुख कोई नहीं. भगवान आपको इस दुख को सहने की शक्ति दे @narendramodi जी. ॐ शांति 🙏
— Akshay Kumar (@akshaykumar) December 30, 2022
याशिवाय अभिनेता अक्षय कुमार यानेदेखील पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्याने ट्वीट शेअर करत लिहिले आहे कि, ‘आईला आपल्यापासून दूर जाताना पाहणं यापेक्षा मोठं दुःख कोणतंच नसतं..’.
My deepest condolences to Shri @narendramodi on the sad demise of his beloved ‘maa’.
भारत माँ के सपूत की माँ का कर्मयोगी जीवन हम सबको प्रेरणा देता रहेगा। शतक शतक नमन।
ओम् शांति। pic.twitter.com/bNPWpI9d2P— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) December 30, 2022
तसेच ‘द काश्मिर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील ट्विटरवर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिलंय कि, ‘श्री नरेंद्र मोदी यांच्या लाडक्या ‘मा’च्या दुःखद निधनाबाबत मी शोक व्यक्त करतो… भारताच्या पुत्राच्या आईचे कर्मयोगी जीवन आम्हाला सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील!! शतक शतक नमन। ओम् शांति।’
तर बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतनेदेखील सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले आहे कि, ‘देव आपल्या पंतप्रधानांना या दुःखद प्रसंगी धैर्य आणि शांती प्रदान करो..ओम शांती..’
आदरणीय @narendramodi जी,माँ का दुनिया से चले जाना बहुत ही दुखदायी होता है। उनका आशीर्वाद हमेशा आपके साथ रहेगा।ईश्वर माता जी को अपने श्री चरणों में स्थान दें हम यही प्रार्थना करते हैं🙏 ओम शांति https://t.co/Vsf2KIi8Us
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) December 30, 2022
याशिवाय कॉमेडियन कपिल शर्माने मोदींच्या ट्वीटरवर रीट्वीट करत लिहिलंय की, ‘आदरणीय पंतप्रधान मोदीजी, आईचं आपल्याला सोडून या जगातून निघून जाणं खूप दुःखदायी आहे. त्यांचा आशीर्वाद कायम तुमच्यासोबत असेल. देव त्याच्या चरणी तुमच्या आईला स्थान देवो ही प्रार्थना..ओम शांती..’
My heartfelt condolences on the passing of Smt. Heeraben Modi. A simple, principled lady, she raised a fine son in our PM Shri Narendra Modiji. 🕉️ Shanti 🙏 My personal condolences to our PM and his family. @narendramodi pic.twitter.com/5RxRXobyca
— Ajay Devgn (@ajaydevgn) December 30, 2022
अभिनेता अजय देवगण याने शोक वक्त करणारे ट्विट शेअर करत लिहिले आहे कि, ‘श्रीमती हिराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल मी मनःपूर्वक शोक व्यक्त करतो. अतिशय साध्या, तत्त्वनिष्ठ महिला ज्यांनी आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्यातील एक चांगला मुलगा घडविला. ओम शांती.. आमचे पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या वैयक्तिक संवेदना.’
Discussion about this post