हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १६ चा हा आठवडा अर्चनाच्या राड्यासह एकदम वादग्रस्त ठरला. एकीकडे अर्चना आणि दुसरीकडे शालीन, प्रियांका, विकास.. प्रत्येकासोबत अर्चनाने पंगा घेतला. दरम्यान तिच्यासोबत भांडताना एकीकडे विकास जातीवर टिप्पणी करून गेला तर दुसरीकडे शालीनने पातळी सोडली. आता शालीन आणि अर्चनामध्ये झालेला वाद आपण पाहिलाच असेल. यात शालीनने अर्चनाला ‘दो टके कि गंदी औरत’ म्हटले. ज्यावर अर्चनाने उलटून म्हटले कि, तुझी आई आणि तुझी बायको आहे. हे ऐकून शालीनने घरात बराच राडा घातला. या भांडणावरून सलमानने अर्चनाचा क्लास घेतला आणि शालीनलाही झापला.
कलर्स टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर काही प्रोमो शेअर करण्यात आले आहेत. यावरून आजचा शुक्रवार का वार एकदम दमदार असणार आहे याचा अंदाज आपण लावूच शकतो.
यातील एका प्रोमोमध्ये सलमान अर्चना गौतमला म्हणतो कि, ‘तू प्रत्येक भांडणात कुणाच्याही आई- वडीलांना का मध्ये आणतेस..? या तुझ्या वागणुकीमुळे तुझी घराबाहेर काहीही इज्जत राहिलेली नाही. जर मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुला शोमध्ये परत आणू शकतो तर याच घरातून एका मिनिटात बाहेर काढण्याची ताकदही माझ्यात आहे’. हे ऐकून अर्चना म्हणते कि, ‘सगळे एकत्र माझ्यावर अटॅक करतात मग मला काही सूचत नाही आणि मी काहीही बोलून बसते’.
यानंतर सलमानची गाडी वळते बिग बॉसच्या घरातील फुल टाइम ऍक्टरवर. सलमान शालीनला विचारतो की, ‘तू एका मुलीला ‘दो टके की गंदी औरत’ असं म्हणूच कसं शकतोस?’ यावर शालीन जोरजोरात ओरडू लागतो आणि म्हणतो की, ‘मी जे काही बोललो ते तिला बोललो.. तिच्या कुटुंबाविषयी नाही. जी व्यक्ती माझ्या आयुष्यात खूप खास आहे, मी त्या व्यक्तीविरोधात काहीच ऐकून घेऊ शकत नाही.’ यावर सलमान त्याला असं काही उत्तर देतो कि त्याची बोलतीच बंद होते. आता सलमानने नक्की असं काय म्हटलं हे जाणून घेण्यासाठी आजचा एपिसोड चुकवू नका.
Discussion about this post